शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

मनाई आदेश झुगारला, ५०० रुपये दंडाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:30 IST

उस्मानाबाद येथील अल्लाउद्दीन रसूल बागवान यांनी मानवी आरोग्यास धोका निर्माण होईल, अशी रोग प्रसाराची शक्यता निर्माण करून नियमांचे उल्लंघन ...

उस्मानाबाद येथील अल्लाउद्दीन रसूल बागवान यांनी मानवी आरोग्यास धोका निर्माण होईल, अशी रोग प्रसाराची शक्यता निर्माण करून नियमांचे उल्लंघन केले होते. याप्रकरणी १० फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी बागवान यास ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास ३ दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.

३२६ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा

उस्मानाबाद : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकास शिस्त लागावी, यासाठी जिल्ह्यातील १८ पोलीस ठाणी व वाहतूक शाखेच्या वतीने धडक मोहीम राबविली जात आहे. बुधवारी जिल्ह्यातील विविध मार्गांवर वाहतूक नियम मोडणाऱ्या ३२६ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या वाहनचालकांकडून ८० हजार ८०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर यापुढेही कारवाया केल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून सांगण्यात आली.

दुचाकीच्या धडकेत पादचारी जखमी

उस्मानाबाद : भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी झाला. हा अपघात ८ फेब्रुवारी रोजी उमरगा येथे झाला.

आळंद तालुक्यातील किणी (सुलतान) येथील विजयकुमार कमलापुरे हे ८ फेब्रुवारी रोजी उमरगा बसस्थानक रस्त्यावर चालत जात होते. यावेळी आळंद तालुक्यातील जागमा येथील कल्याणी भिमशा हडपत याने दुचाकी क्र. केए- ३२ ईडब्ल्यू- ८५०७ निष्काळजीपणे चालवून कमलापुरे यांना जोराची धडक दिली. या अपघातात कमलापुरे यांचा डावा हात मोडला. असा जबाब विजयकुमार कमलापुरे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिला. यावरून कल्याणी हडपत यांच्याविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

जुन्या भांडणावरून दाम्पत्यास मारहाण

उस्मानाबाद : जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी दाम्पत्यास बेदम मारहाण केली. ही घटना ६ फेब्रुवारी रोजी कळंब तालुक्यातील मंगरुळ येथे घडली.

केज तालुक्यातील सावरगाव (बोरी) येथील विष्णू बब्रुवान पौळ व त्यांची पत्नी मंगरुळ येथे ६ फेब्रुवारी रोजी आले होते. यावेळी मंगरुळ येथील किसन बाबूराव कांबळे व शहाजी कांबळे यांनी त्या दाम्पत्यास जुन्या भांडणाच्या कारणावरून दगड, काठीने मारहाण केली, असा जबाब विष्णू पौळ यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिला. यावरून उपरोक्त दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला.