शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

तिरंगी, चौरंगी लढतीची शक्यता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:29 IST

लोहारा : राज्यात सत्तेतील महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत तालुक्यात एकदिलाने काम केले. परंतु, ग्रामपंचायत निवडणुकीत बहुतांश ठिकाणी ...

लोहारा : राज्यात सत्तेतील महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत तालुक्यात एकदिलाने काम केले. परंतु, ग्रामपंचायत निवडणुकीत बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडीत लढत होणार असल्याने स्थानिक नेते, कार्यकर्त्यांची चांगलीच अडचण होणार असल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे निवडणूक आयोगाने ऑक्टोबरमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित केला. त्यामुळे लोहारा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका थांबल्या होत्या. त्यानंतर मुदत संपणाऱ्या २६ ग्रामपंचायतींवर प्रशासकाच्या नियुत्या करण्यात आल्या. यामुळे निवडणुका कधी होतात. याकडे गावपुढारी डोळे लावून बसले होते. त्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आणि गावागावांत कडाक्याच्या थंडीतही निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापत आहे. दरम्यान, सरपंचपदाचे आरक्षण हे निवडणुकीनंतर काढण्यात येणार असल्याचे तसेच सरपंचदासाठीचा उमेदवाराचे शिक्षण किमान सातवी असणे बंधनकारक केल्यानेही पॅनेलप्रमुखांची चांगलीच गोची झाली आहे.

राज्यात शिवसेना, कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस या महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आ. सतीश चव्हाण यांचा प्रचार तिन्ही पक्षातील नेत्यांनी एकदिलाने केला. यातील विजयामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. परंतु, स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीमधील पक्षातील कार्यकर्ते एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. त्यात निवडणूक होऊ घातलेल्य २६ ग्रामपंचायतींमध्ये भाजपाचे फारसे अस्तित्व नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट असले तरी बऱ्याच ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना व काँग्रेसमध्ये दुरंगी सामना रंगणार आहे. यामुळे मात्र स्थानिक पातळीवर पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, पक्षाचे पदाधिकारी यांची चांगलीच अडचण होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गावस्तरावर आपल्या पक्षाची, नेत्यांची बाजू खंबीरपणे सांभाळणारा कार्यकर्ता मात्र आता या निवडणुकीत एकटा पडणार आहे.

चौकट....

या ग्रामपंचायतींसाठी होणार निवडणूक

लोहारा तालुक्यातील आरणी, कानेगाव, भातागळी, कास्ती बु ,कास्ती खुर्द, मार्डी, लोहारा खुर्द, राजेगाव, एकोंडी लो, मुर्शदपूर, उदतपूर, तावशीगड, चिंचोली काटे, मोघा, बेलवाडी, हराळी, कोंडजीगड, करवंजी, हिप्परगा सय्यद, फणेपूर, भोसगा, आष्टाकासार, होळी, दस्तापूर, धानुरी व करजगाव या २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.

बिनविरोधसाठी प्रयत्न सुरू

तालुक्यातील फणेपूर, आरणी या ग्रामपंचायतीच्या निवडणुका यापूर्वी बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे यापुढेही या ग्रामपंचायती बिनविरोध काढण्यासाठी गावस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. लोहारा खुर्दही बिनविरोध काढण्यात आली होती. परंतु, आयत्यावेळी दोन जागांसाठी निवडणुका झाल्या. परंतु, येथील सरपंच, उपसरपंच निवड मात्र बिनविरोध झाली. सध्या बिनविरोध काढण्यासाठी दोनवेळा सर्वपक्षीय बैठका झाल्या असून त्यात बऱ्यापैकी यश आल्याने बिनविरोधची आशा वर्तवली जात आहे. तसेच राजेगावातही बिनविरोधसाठी सर्वपक्षीय बैठक झाली असून बिनविरोध काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.