शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांसाठी सकस दाल खिचडीची पार्सल सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:34 IST

उमरगा : दिवसेंदिवस कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्णांनी शहरातील दवाखाने भरलेले आहेत. रुग्ण, नातेवाईक व त्यांच्या ...

उमरगा : दिवसेंदिवस कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्णांनी शहरातील दवाखाने भरलेले आहेत. रुग्ण, नातेवाईक व त्यांच्या सेवेत कार्य करणाऱ्यांना पौष्टिक आहार मिळावा या उद्देशाने श्री स्वामी समर्थ अन्नसेवा मंडळाच्या माध्यमातून सकस दालखिचडी पार्सल सेवेची सुरुवात बुधवार उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे करण्यात आली. शहरातील सर्व कोविड रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईक यांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

काेराेनाचा संसर्क राेखण्यासाठी निर्बंध कठाेर केले आहेत. त्यामुळे हाॅटेलसह अन्य दुकाने बंद आहेत. त्यामुळे काेविड सेंटरमधील रुग्णांसह त्यांच्यासाेबत आलेल्या नातेवाइकांना वेळेवर जेवण मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन श्री स्वामी समर्थ अन्नसेवा मंडळाच्या माध्यमातून सकस दालखिचडी माेफत पार्सल सेवा सुरू करण्यात आली आहे. यासाठी प्रसिद्ध उद्याेजक सिद्रामपा चिंचोळे, विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. दिलीप सगर, माजी अध्यक्ष ॲड. प्रवीण तोतला व अन्नसेवा मंडळाचे सदस्य यांच्या पुढाकाराने ही पार्सल सेवा सुरू करण्यात आली. डॉ. कपिल चंद्रकांत महाजन यांनी यासाठी आपली जागा उपलब्ध करून दिली. मोहन कोथिंबिरे, ॲड. अमित सांगावे, ॲड. शीतल चव्हाण, ॲड. अक्षय तोतला, ॲड. सिद्राम हंद्राळे, माहेश्वरी संघटनेचे शहराध्यक्ष दीपक लाहोटी, बसवराज वरकले, माजी मुख्याध्यपक अनिल धारूरकर, अशोक पतगे, मधुकर गुरव, विनायकराव माने, श्रीकांत हेड्डा, बाबूभाई बोअरवेलवाले, अमरसिंघ चौहान, आशिष भुतडा, शमीमसाब सास्तुरे, पिंटू कुलकर्णी आदी अन्नदातासह नगरसेवक एम. ओ. पाटील व साखरे जलकुंभ यांच्या वतीने मोफत पाणी, दिग्विजय गॅस एजन्सीज यांच्या वतीने मोफत गॅस सिलिंडर सेवा देण्यात येणार आहे. यासाठी गोवर्धन गोशाळेचे सचिव विठ्ठल तेलंग, माहेश्वरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवप्रसाद लड्डा, उपाध्यक्ष श्रीकांत सोमाणी, मनीष सोनी, विष्णू पांचाळ, संजय लड्डा, विठ्ठलदास लड्डा, रामेश्वर सोमाणी, सचिन बिद्री, करण काळे, निखिल पवार, स्वप्निल पवार, रोहन फुके, अंबादास पवार, व्यंकटेश थोरे, रवी नळदुर्गकर, सागर नळदुर्गकर, चैतन्य कुलकर्णी, आनंद रखेलकर,

निनाद भडोळे, दीपक राठोड आदी यासाठी परिश्रम घेत आहेत.