शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाची कासवगती; गरज रोज २० हजार डोसची, मिळतात केवळ तीन हजार डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:34 IST

जिल्ह्यात शासकीय २११ व खासगी ११ अशा एकूण २१९ लसीकरण केंद्राची संख्या आहे. मात्र, जिल्हास मागणीच्या तुलनेत लसीचा पुरवठा ...

जिल्ह्यात शासकीय २११ व खासगी ११ अशा एकूण २१९ लसीकरण केंद्राची संख्या आहे. मात्र, जिल्हास मागणीच्या तुलनेत लसीचा पुरवठा कमी होत असल्याने यातील अनेक केंद्रे बंद राहत आहेत. सोमवारी १८ ते ४४ वयोगटांतील व्यक्तींसाठी ११ केंद्र सुरू ठेवण्यात आले होते, तर ४५ वयोगटापुढील व्यक्तींसाठीचे केंद्र बंदच होते. जिल्ह्यास आठवड्याला १ लाख ते १ लाख २० हजार लसीची आवश्यकता भासते; परंतु १९ हजार ते २० हजार डोस मिळत आहेत. ही लसही दोन दिवसांत संपत आहे. १८ ते ४४ वयोगटांसाठी लसीकरणाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यानुसार कोविन ॲपवर नोंदणी केली जात आहे. कोवॅक्सिन या लसीचा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आहे. अनेकांना दुसरा डोस ठरवून दिलेल्या कालावधीत संपल्यानंतरही लस उपलब्ध होण्यास विलंब होत असल्याचे चित्र आहे. यातून नागरिक धास्तावत आहेत.

केवळ ११ केंद्रे सुरू

जिल्ह्यात २१९ केंद्राची निर्मिती करण्यात आली. या केंद्रावर आठवड्याला १ लाख ते १ लाख २० हजार लसीची आवश्यकता लागते. मात्र, केवळ २० हजार लसीचा पुरवठा होत आहे. या लसीही संपत आहेत. सोमवारी १८ व ४४ वयोगटांतील व्यक्तींना ११ केंद्रांवर लस देण्यात आली.

१८ ते ४४ वयोगटांसाठी १३ लाख नागरिकांना लसीची आवश्यकता आहे. प्रत्येकजण कोरोना काळात लस मिळाली म्हणून ऑनलाईनवर प्रयत्न करीत आहे. मात्र, हे संकेतस्थळ कधी उघडेल आणि कधी हाऊसफुल्ल होईल हे सांगताच येत नाही. यामुळे इच्छा असतानाही अनेकांना लसीकरण करता आले नाही. एकाच घरातील दोन व्यक्तींना लस घ्यायची असेल. त्यात १८ ते ४४ आणि ४५ पुढे अशा दोन्ही सदस्यांना दोन वेगळ्या सेंटरवर जावे लागते.

दुसऱ्या डोसचा गोंधळ वाढला

गेल्या आठवड्यात केवळ दोन वेळा डोस उपलब्ध झाले. तेही तीन ते चार दिवसांत संपले. १८ ते ४४ वयोगटांसाठी ११ केंद्रे सुरू आहेत; पण ही मंडळी सर्वच केंद्रांवर रांगा लावत आहेत. त्यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे दुसरा डोस घेण्याची मुदत झालेल्यांना या रांगेतून संधीच मिळत नसल्यांच्या तक्रारी वाढत आहेत.

लसीकरणाची कासवगती; गरज रोज हजार डोसची, मिळतात केवळ ३ हजार डोस

उस्मानाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मृत्यूची संख्या वाढल्याने नागरिकांना चांगलीच धास्ती बसली आहे. त्यामुळे नागरिक लस टोचून घेण्यासाठी पुढे येत आहेत. प्रतिदिन २० हजार लसची आवश्यकता असताना तीन हजार डोस मिळत आहेत. मागणीच्या तुलनेत लसीचा पुरवठा कमी होत असल्याने केंद्र बंद राहत आहेत.

प्रतिक्रिया...

गेल्या महिन्यात कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला आहे. २८ दिवसांचा कालावधी लोटून १० दिवस झाले आहेत. मात्र, दुसरा डोस अद्याप मिळत नाही. ४५ वर्षांपुढील नागरिकांसाठी सुरू असणारे केंद्रही बंद करण्यात आले आहेत.

चंद्रकांत सोनटक्के

प्रतिदिन रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्ण संख्या वाढू लागल्याने सुरक्षेसाठी लस घ्यावी, यासाठी केंद्रावर जाऊन आलो. मात्र, केंद्र बंदच राहत आहे. ज्या दिवशी केंद्र सुरू राहते. त्या दिवशीही नंबर येईपर्यंत केंद्र बंद होते. आरोग्य विभागाने नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता प्रत्येक गावात जाऊन लसीकरण करावे.

संभाजी वाघमारे,

१८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना ३ मे पासून लस दिली जात आहे. मात्र, लस घेण्यापूर्वी पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. मात्र, स्लॉट बुकिंग दाखविली जात आहे. त्यामुळे लस घेण्यास विलंब होत आहे.

विवेक वाघमोडे,