शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:21 IST

(फोटो : २९ समीर) उमरगा : येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्पाच्या उभारणीचे काम पूर्ण झाले असून, सोमवारी वैद्यकीय अधीक्षक ...

(फोटो : २९ समीर)

उमरगा : येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्पाच्या उभारणीचे काम पूर्ण झाले असून, सोमवारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक बडे यांच्या हस्ते मशिनरीचे पूजन करण्यात आले. तांत्रिक विभागाने प्रकल्पाची चाचणी घेतली असून, ती यशस्वी झाली आहे. त्यामुळे उर्वरित काम गतीने मार्गी लागल्यास रुग्णालयातील सर्व कक्षाला लवकरच हवेतून मिळणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा सुरू होणार आहे.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मोठी कमतरता जाणवली. ही गरज ओळखून उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन टँक उभारणी परवानगी आ. ज्ञानराज चौगुले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली होती शिवाय अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडेही त्यांनी यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर ऑक्सिजन टँकच्या प्लांटला मंजुरी मिळाली. मात्र, पुढच्या कामाच्या हालचाली होत नव्हत्या. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी हा प्रकल्प लवकर कार्यान्वित करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना उमरगा येथील दौऱ्यात दिल्या होत्या.

दरम्यान, सोमवारी पीएसए ऑक्सिजन प्लांटची पूर्व तपासणी व उद्‍घाटन डॉ. बडे यांच्या करण्यात आले. यावेळी प्रकल्प व्यवस्थापक रूपेश देशमुख, सेवा अभियंता विनय पाटे (पुणे), डॉ. विक्रम आळंगेकर, औषध निर्माण अधिकारी आनंद सुटनुरे, कार्यालयीन अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, साहाय्यक अधीक्षक हणमंत कुंभार, अमर पवार, शीतल चिलोबा, विद्यासागर फुलसुंदर, स्वाती डोंगरे, सुभद्रा गाढवे, प्रकल्प बांधकामाचे ठेकेदार विजय काळे उपस्थित होते. कोरोनाच्या लाटेत उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा कमी होत होता. आता प्रकल्पच सुरू होणार असल्याने येणाऱ्या काळात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. प्रकल्पाची पूर्व चाचणी यशस्वी झाली असून, उर्वरित कामाला प्रशासकीय स्तरावरून गती मिळणे आवश्यक आहे.