शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्टेराॅईड, सीटीस्कॅनचा अतिमारा कोरोना रुग्णांना घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:35 IST

उस्मानाबाद : कोरोना रुग्णांच्या निदानापासून तर उपचारापर्यंत अनेक गोष्टींचा वापर होत आहे. स्टेरॉईड ही त्यातीलच एक बाब आहे. अनेक ...

उस्मानाबाद : कोरोना रुग्णांच्या निदानापासून तर उपचारापर्यंत अनेक गोष्टींचा वापर होत आहे. स्टेरॉईड ही त्यातीलच एक बाब आहे. अनेक रुग्ण हे स्वत:हून लवकर बरे वाटेल या विचारातून स्टेरॉइड वापर करीत असतात. त्यातून रुग्णांना दुष्परिणामांना तोंड देण्याची वेळ येत आहे. यासोबतच अनावश्यक व अधिक प्रमाणात सिटी स्कॅन केल्यामुळे कर्करोगाला आमंत्रण मिळण्याची भिती व्यक्त केली जात आहे. मागील तेरा महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाच्या निदानापासून तर उपचारापर्यंत अनेक गोष्टींचा वापर केला जात आहे. गंभीर व मध्यम स्वरुपाच्या रुग्णांना रुग्णालयात तर सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटर तसेच गृहविलगीकरणात ठेवण्यात येत आहे. ९५ च्या खाली सॅच्युरेशन गेलेल्या रुग्णांना डॉक्टर उपचारासाठी स्टेरॉईड दिले जात आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात स्टेरॉईड वापर घातक असले तरी अनेकजण लवकर बरे व्हावे, यासाठी स्टेरॉईड घेत आहेत. काहीजण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टेरॉईड घेत आहेत. त्यामुळे रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी होऊन न्युमोनिया, म्युकरमायकोसिस असे आजार बळावण्याची शक्यता आहे. तसेच प्रकृती चांगली असतानाही वारंवार सीटीस्कॅन करणे कर्करोगाला आमंत्रण देणारे असल्याचे क्षयकिरण तज्ज्ञांनी सांगितले.

म्युकरमायकोसिस आजाराचा धोका

सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना स्टेरॉईडची गरज भासत नाही. ज्या रुग्णांचे सॅच्युरेशन ९५ च्या खाली आहे अशाच रुग्णांना डॉक्टर तपासणीनंतर स्टेरॉईड देतात. मात्र अनेक रुग्ण लवकर बरे होण्यासाठी स्वत:हून स्टेराईड औषघी घेतात. त्यामुळे न्युमोनिया, म्युकरमायकोसिस असे आजार जडण्याची शक्यता असते. सध्या जिल्ह्यात अशा केसेस आढळून आल्या नाहीत. मात्र, अतिवापरामुळे धोका असल्याने रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधी घ्यावे, असे जिल्हा रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बोडके

म्हणाले.

१५० सीटी स्कॅन होतात दररोज

उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅनची सुविधा असून, डॉक्टरांच्या सल्ल्याने तेथे ६० ते ७० सीटीस्कॅन केले जातात

शहरात खाजगी तीन सीटीस्कॅन सेंटर आहेत. या केंद्रावरही रुग्ण दिवसभर सीटी स्कॅन एचआरसीटी साठी गर्दी करीत असतात. प्रत्येक केंद्रावर ३० ते ४० सीटीस्कॅन केले जाते. जिल्हा रुग्णालय व खाजगी केंद्राचे मिळून प्रतिदिन १५० च्यावर दररोज सीटीस्कॅन होत असतात.

एक सीटीस्कॅन म्हणजे ३०० ते ४०० एक्सरे

एक सीटीस्कॅन म्हणजे ३०० ते ४०० एक्सरे काढण्यासारखे आहे. त्याचे दुष्परिणाम मानवी शरिराव होऊ शकतात. लहान मुले व तरुण वयातील रुग्णांना उतारत्या वयात कर्करोगा सारखा आजार जडू शकतो. त्यामुळे कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर डॉक्टरांच्या सल्याशिवाय सीटीस्कॅन एचआरसीटी काढणे टाळावे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कोट...

एक सीटीस्कॅन ३०० ते ४०० एक्सरे काढण्याच्या बराेबर आहे. क्षकिरणांचा शरिरावर अतिमारा झाल्याने उतारत्या वयात कर्करोग धोण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुरुषांमध्ये नपुसकता, थॉयरॉईड तर महिलांमध्ये व्यंध्यत्व येण्याचा धोका अधिक असतो. कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर मित्र व नातेवाईकांनी दिलेल्या सल्ल्याने अनेक जण सीटीस्कॅन करुन घेण्यास प्राधान्य देतात. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सीटीस्कॅन केले जात आहेत. रुग्णांनी स्कोर कमी असताना विनाकारण सीटीस्कॅन करणे टाळावे.

अनिल चव्हाण, रेडिओलॉजिस्ट, जिल्हा रुग्णालय