शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञासह ऑपरेटर निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:34 IST

पाथरुड : भूम तालुक्यातील सर्वात मोठे विद्युत उपकेंद्र असलेल्या पाथरुड येथील ३३ केव्हीए उपकेंद्रातून होणारा विद्युत पुरवठा ...

पाथरुड : भूम तालुक्यातील सर्वात मोठे विद्युत उपकेंद्र असलेल्या पाथरुड येथील ३३ केव्हीए उपकेंद्रातून होणारा विद्युत पुरवठा २८ एप्रिल रोजी ऑपरेटर व विद्युत कर्मचाऱ्यांत निर्माण झालेल्या मतभेदांमुळे काहीकाळ खंडित राहिला हाेता. याचा फटका पाथरूडसह परिसरातील पंधरा गावांतील ग्राहकांना बसला हाेता. याबाबत ‘लाेकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महावितरणच्या वरिष्ठांकडून वाॅपरेटरसह वरिष्ठ तंत्रज्ञासही निलंबित केले आहे.

पाथरुड ३३ केव्हीए विद्युत उपकेंद्रातून पाथरुडसह नान्नजवाडी, बागलवाडी, उमाचीवाडी, वडाचीवाडी, दुधोडी, सावरगाव, आनंदवाडी नळीवडगाव, घुलेवाडी, अंतरवली, नळी अशा जवळपास १५ गावांना घरगुती व कृषीपंपाना विद्युतपुरवठा हाेताे. मात्र, २८ मे रोजी येथील ऑपरेटर व विद्युत कर्मचारी यांच्यात काही कारणावरून मतभेद झाल्याने ३३ केव्ही उपकेंद्रातून होणारा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. परिणामी, लाॅकडाऊन व ऐन कडाक्याच्या उकाड्यात घरात थांबलेल्या लाेकांचे हाल झाले. तर कृषीपंपाचाही विद्युतपुरवठा खंडित असल्याने गैरसोय झाली होती. याबाबत ‘लाेकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल वरिष्ठ स्तरावरून घेण्यात आली. संबंधित ऑपरेटर व वरिष्ठ तंत्रज्ञ यांना कारणे दाखवा नोटीस बजावून या प्रकरणाचा खुलासा मागविला. त्यानुसार संबंधितांनी खुलासाही दिला. परंतु, दोघांचाही खुलासा असमाधानकारक असल्याने अखेर कार्यकारी अभियंत्यांनी ६ मे रोजी आदेश काढत संबंधित विद्युत तंत्रज्ञ व ऑपरेटर यांच्या निलंबनाचा आदेश काढला. निलबंन कालावधीत त्यांना आठवड्यातील तीन दिवस म्हणजेच सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी सकाळी १० वाजता उपकार्यकारी कार्यालय वाशी येथे हजेरी द्यावी, असे आदेशात म्हटले आहे.

चाैकट...

पाथरुड ३३ केव्हीए केंद्रामध्ये कार्यत असलेले वरिष्ठ तंत्रज्ञ नाना बाराते हे रात्री- अपरात्री जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावतात. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध करण्यात आलेली निलंबनाची कारवाई मागे घ्यावी. तसेच इतरत्र बदली न करता त्यांना पाथरूड येथे ठेवावे. अन्यथा शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रास्ता राेकाे आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा भटके विमुक्त जमातीचे जिल्हाध्यक्ष सीताराम वनवे यांनी दिला आहे.

पाथरुड ३३ केव्हीए उपकेंद्रात कनिष्ठ अभियंता हे पद सहा महिन्यांपासून रिक्त आहे. वरिष्ठ तंत्रज्ञ नाना बाराते यांनी योग्य नियोजन करीत पाथरूडसह परिसरातील १५ गावांमध्ये सुरळीत विद्युत पुरवठा केला. त्यामुळे बाराते यांचे निलंबन मागे घेण्यात यावे, अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख डाॅ. चेतन बाेराडे, वैजिनाथ म्हमाणे आदींची उपस्थिती हाेती.