शेळगाव येथून मोबाइल केला लंपास
उस्मानाबाद : टेबलवर ठेवलेला मोबाइल अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना परंडा तालुक्यातील शेळगाव येथे ७ फेब्रुवारी रोजी घडली.
शेळगाव येथील रत्नाकर कोल्हे हे ७ फेब्रुवारी रोजी त्यांच्या कृषिसेवा केंद्रात थांबले होते. त्यांनी खिशातील टेबलवर ठेवलेला मोबाइल अज्ञात व्यक्तीने चाेरून नेला. मोबाइल चोरीला गेल्याचे समजताच कोल्हे यांनी आंबी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध फिर्याद दिली. यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
चौघांच्या खात्यावरील रक्कम अज्ञाताने एटीएममधून परस्पर काढली
उस्मानाबाद : चार व्यक्तींच्या बँक खात्यातील रक्कम अज्ञात व्यक्तीने एटीएमधून काढल्याचे ७ फेब्रुवारी रोजी उघडकीस आले. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.
उस्मानाबाद शहरातील समता वसाहत परिसरात असणाऱ्या एटीएम केंद्रातून ४ व ५ फेब्रुवारीदरम्यान अज्ञाताने बँक खात्यातील सचिन तीर्थकर यांचे ४० हजार रुपये, श्रीकांत साठे यांचे ८ हजार १०० रुपये, गोवर्धन जाधव यांचे ३८ हजार ५०० रुपये, मधुकर शिराळ यांचे २ हजार २१ रुपये असा एकूण ८८ हजार ६२१ रुपये परस्पर काढून घेतले. फसवणूक झाल्याचे समजात सचिन तीर्थकर यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध फिर्याद दिली. यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२० आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कमल-६६ अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे.