शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

रस्ते नव्हे, मृत्युचे सापळे !

By admin | Updated: August 4, 2014 00:50 IST

विजय मुंडे, उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य मार्गासह ग्रामीण भागातील रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे़ साडेचार वर्षात तब्बल ३२४५ अपघात झाले

विजय मुंडे, उस्मानाबादजिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य मार्गासह ग्रामीण भागातील रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे़ साडेचार वर्षात तब्बल ३२४५ अपघात झाले असून, यात १४६८ जणांना प्राणास मुकावे लागले आहे़ तर ४८१७ लोक जखमी झाले आहेत़ यातील अनेकांना हात-पाय गमवावे लागले आहेत़ प्रशासनाची उदासिन भूमिका, कायद्याचा नसलेला धाक आणि ‘अर्थकारणा’ने चालणारा प्रवास अशी अनेक कारणे याला जाबाबदार दिसून येतात़जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरच नव्हे तर ग्रामीण भागातील भीषण अपघातांनी अनेकांचे ह्दय हेलावून सोडले आहे़ नळदुर्ग नजीक पुलावरून कोसळलेली लग्झरी, तुळजापूर नजीक विद्यार्थ्यांच्या बसला झालेला अपघात, चोराखळी नजीक गावाकडे परतणाऱ्या भाविकांवर काळाने घातलेला घाला, अशी एक नव्हे अनेक उदाहरणे समोर आहेत़ मोठा अपघात झाल्यानंतर काही काळ पोलिस, उपप्रादेशिक परिवहन, एस़टी़महामंडळासह इतर प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येतो़ एऱ्हवी मात्र, ‘हम-साथ-साथ’ म्हणत केल्या जाणाऱ्या ‘अर्थकारणा’मुळे राजरोसपणे अवैध प्रवाशी वाहतुकीसह वाहतुकीचे नियम ढाब्यावर बसविण्याचा प्रकार सुरू आहे़ त्यामुळेच अपघाताच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे़ साडेचार वर्षातील आकडेवारी पाहता २०१३ मध्ये अपघाताची संख्या कमी असली तरी ३२५ जण ठार झाले असून, ९०१ लोक जखमी झाले आहेत़ चालू वर्षी जून अखेरपर्यंत ३४२ अपघात झाले असून, यात १६३ जणांना प्राण गमवावे लागले आहेत़ तर ६३१ जण जखमी झाले आहेत़ अवैैध प्रवाशी वाहतुकही बऱ्याचअंशी अपघाताला कारणीभूत ठरत आहे.कारवाईचा बडगा हवारस्ता सुरक्षा मोहीम किंवा एखादे टार्गेट आल्यानंतर मोठ्या प्रमाणात कारवाईचा बडगा उगारण्यात येतो़ त्यात किरकोळ चुका धरूनही दंडाची पावती हाती सोपविण्यात येते़ मात्र, वर्षातील ३६५ दिवस सातत्याने ‘राजकारण विरहित’ कारवाईसत्र राबविले तर अपघाताला लागम लागण्यासह वाहतुकीचे नियम पाळणाची सवयही अनेकांना लागेल.खड्डेही ठरताहेत कारणराष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग असो अथवा ग्रामीण भागातील रस्ता असो खड्डा नाही असा एकही रस्ता जिल्ह्यात सापडणार नाही़ नव्हे, हे उस्मानाबाद जिल्ह्याचे वैशिष्ठ्यच म्हणावे लागेल! त्यात खचलेल्या साईडपट्ट्यांनी त्यावर कळस चढविला आहे़ खड्ड्यांमुळे अपघात वाढत आहेत.कुटुंबावर आघातअपघातात कुणाचा बाप, कुणाची आई तर पती, पत्नी, बहिण, मुलगा, मुलगी अशा अनेकांना आपला जीव गमवावा लागतो़ यातील अनेकजण घराचा आधारवड असतात़ घराचा आधारवडच निघून गेला तर कुटुंबावर काय संकट कोसळते ते त्या कुटुंबालाच माहिती़ त्यामुळे वाहने चालविताना स्वत:सह प्रवाशांच्या जीवाची काळजी घेण्याचे अद्य कर्तव्य चालकांनी बाळगण्याची गरज आहे़सा डे चा र व र्षा ती ल अ प घा तवर्ष अपघातठारजखमी२०१० ७२७२९०११४२२०११ ७५४२९१११७१२०१२ ७९७३९९९७२२०१३ ६५२३२५९०१जून २०१४ ३४२१६३६३१एकूण ३२४५१४६८४८१७एखादा अपघात झाला की बघ्यांची गर्दी होते़ मात्र, पोलिस येईपर्यंत जखमींना मदत करण्यासाठी कुणाचेच हात पुढे येत नाही़ बहुतांश वेळा असे होते़ नागरिकांनी मनातील चौकशीचा ससेमिरा बाजूला करून अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याची गरज आहे़ आपल्या काही तासाच्या वेळेमुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात़ हे जमत नसेल तर १०० क्रमांकावर किंवा जवळील पोलिस ठाण्याशी संपर्क करून त्वरित माहिती द्या़ वेग मर्यादेचे उल्लंघनदोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवणे.योग्य अंदाज न बांधणे.चुकीच्या पध्दतीने ओव्हरटेक करणे.वाहन मागे घेताना दक्षता न बाळगणे.योग्य तो इशारा न देणे.मद्यप्राषण करून वाहन चालविणे.सर्वसामान्यांच्या चुकांमुळे (रस्त्यावर येणे, वाहन न पाहणे, चालत्या गाडीतून उतरणे आदी़)अशी घ्या दक्षतावाहतुकीचे नियम पाळा.मद्यप्राषण करून नका.अवैैध प्रवाशी वाहतूक टाळा.वळणावर दक्षता घ्या.दिशादर्शक, सूचना फलकाकडे लक्ष द्या.शिकावू चालकांच्या हाती रस्त्यावर वाहन देवू नका.वाहनांची वेळोवेळी सर्व्हिसिंग करा.किरकोळ बिघाडही दुरूस्त करून घ्या.