मुंबई : केंद्रात सात वर्षांपासून भाजप प्रणित सरकारची सत्ता आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फसव्या आश्वासनावर विश्वास ठेवून जनतेने त्यांना पुन्हा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बहुमताने सत्ता दिली. सत्तेचा जनतेच्या हितासाठी उपयोग न करता त्यांनी सामान्य जनतेची पिळवणूक करणे चालू ठेवल्याचा आराेप करीत राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने शनिवारी माेर्चा काढून इंधन तसेच गॅस सिलिंडर दरवाढीचा निषेध नाेंदविला.
दैनंदिन जीवनात अत्यावश्यक गरज असलेल्या गॅस सिलिंडरचा दर तब्बल २५ रूपयांनी वाढविला आहे. त्यामुळे एका सिलिंडरसाठी जनतेला ८६० रुपये माेजावे लागत आहेत. परिणामी गृहिणींचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. भाजपा सरकार एवढ्यावरच थांबले नाही तर पेट्रोलचा दर १०५ रुपये व डिझेलचा दर ९६ रूपयांवर नेऊन ठेवला आहे. परिणामी जीवनावश्यक वस्तूंचा वाहतूक खर्च माेठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे सध्या महागाईचा भडका उडाला आहे. परिणामी आता जगावे तरी कसे? असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. असे असतानाही सर्वसामान्यांच्या हिताच्या गप्पा मारून सत्तेची चावी हाती घेतलेले पंतप्रधान नरेंद्र माेदी चकार शब्द बाेलायला तयार नाहीत, असा आराेप करीत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने शनिवारी माेर्चा काढून दरवाढीचा निषेध नाेंदविला. यावेळी संतप्त पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविराेधी घाेषणाबाजी करीत दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. यावेळी मसूद शेख, आदित्य गोरे, मनीषा पाटील, अप्सरा पठाण, श्वेता दुरूगकर, नंदकुमार गवारे, गौस तांबोळी, स्वामी बाळासाहेब मल्हारी, खलील पठाण, संतोष पवार, विशाल शिंगाडे, श्याम घोग, नानासाहेब जमदाडे, वाजिद खान पठाण, सचिन तावडे, मनोज मुदगल महादेव माळी, अमोल सुरवसे, तनमय राऊत, महादेव माळी , शहर उपाध्यक्ष राजनंदनी जाधव, इक्बाल शेख, दशरथ माने, धनंजय पाटील, रॉबिन बागडे, तेजस भालेराव, नितीन चव्हाण, कमलाकर बनसोडे, विराट पाटील, इलियास पिरजादे, मृत्युंजय बनसोडे, अनिकेत पाटील, संतोष पवार, कादर खान, जमाल तांबोळी, लतिफ पटेल आदी उपस्थित हाेते.