शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

होरपळलेल्या डॉक्टरच्या मृत्यूचे गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:34 IST

उस्मानाबाद : शहरातील एका डॉक्टरचा कारमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी उजेडात आली होती. रात्री उशिरा मृतदेहाची ओळख ...

उस्मानाबाद : शहरातील एका डॉक्टरचा कारमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी उजेडात आली होती. रात्री उशिरा मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी या मृत्यूची शहर ठाण्याला नोंद घेत तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेतील पुरेसे कोणतेही कंगोरे पोलिसांच्या हाती नसल्याने घात, अपघात आणि आत्महत्या अशा तिन्ही बाजूने तपास करण्याचे आव्हान उभे आहे.

उस्मानाबाद शहरात वास्तव्यास असलेले डॉ.रवींद्र करपे हे तालुक्यातील येडशी येथे प्रॅक्टिस करीत होते. तेथे त्यांचा दवाखानाही होता. मात्र, मागील दोन महिन्यांपासून हा दवाखाना बंदच असल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास धुळे-सोलापूर महामार्गावरील ग्रीनलँड शाळेच्या बाजूच्या मोकळ्या आवारात एक कार पेटल्याचे तेथून प्रवास करणाऱ्या काहीजणांच्या लक्षात आले. ही माहिती शहर पोलिसांना कळाली. ते पोहोचेपर्यंत आगीने पूर्ण कार कवेत घेतली होती. आग विझविल्यानंतर आत एक मृतदेह ड्रायव्हिंग सीटवर असल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळाचा पंचनामा करून शहर पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेला. या मृत्यूची नोंदही घेतली. रात्री हा मृतदेह डॉ.करपे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ते आर्थिक अडचणीत असल्याचे समोर येत आहे. असे असले तरी ही घटना म्हणजे घात की अपघात किंबहुणा आत्महत्याही असू शकते. अशा सर्व शक्यतांची पडताळणी पोलिसांनी आता सुरू केली आहे. डॉ.करपे यांचा व्हिसेरा फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आला असून, त्याचा अहवाल मिळाल्यानंतर तपासाला योग्य दिशा मिळू शकते.

घात..?

मयत डॉ.रवींद्र करपे हे प्राथमिक तपासात आर्थिक अडचणीत असल्याचे समाेर येत आहे. आर्थिक देवाण-घेवाणीतून तर हा प्रकार घडला नसावा, अशीही शंका व्यक्त केली जात आहे. कारमध्ये मृतदेह बांधलेल्या अवस्थेत होता, अशा चर्चा सुरुवातीला उठल्या होत्या. मात्र, नंतर याठिकाणी बांधल्याचा खाणाखुणा आढळल्या नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, उत्तरीय तपासणी अहवालातून मृत्यू होरपळल्यानेच झाला की तत्पूर्वीच झाला होता, हे स्पष्ट झाल्यास घाताच्या दिशेनेही तपास होऊ शकतो.

अपघात..?

डॉ.करपे यांची कार ही मोकळ्या जागेत उभी होती. कारच्या काचा बंद अवस्थेत होत्या. आगीनंतर त्यांचा एकच मृतदेह यात आढळून आला. एसी सुरू ठेऊन वाहनात काही अग्निजन्य पदार्थ पेटविला जाऊन कारने पेट घेतला असावा, अशीही शक्यता आहे. मात्र, वायरल व्हिडिओत कार मागून पेटलेले दिसत आहे. दरम्यान, या कंपनीच्या काही डिफेक्टेड असल्याची माहिती कळल्यानंतर पोलिसांनी कंपनीकडे या कारबाबत माहिती मागिवली आहे. यातून ही कार आपोआप तर पेटली नसेल, या शंकेचे उत्तर मिळविण्याचा प्रयत्न होत आहे.

आत्महत्या..?

डॉ.करपे यांचा येडशी येथील दवाखाना दोन महिन्यांपासून बंद होता. काही आर्थिक अडचणी असाव्यात. कुटुंबातील काही मालमत्ताही नुकतीच विक्री झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. यातून ते डिप्रेशनमध्ये जाऊन हा प्रकार घडला असावा, या शक्यतेवरही काम केले जात आहे. मात्र, तूर्त घात किवा अपघात यावरच पोलिसांचा अधिक फोकस आहे. मृत्यूबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच यापैकी घात-अपघात किंवा आत्महत्या याबाबतचा बराचसा खुलासा होण्याची शक्यता आहे.