शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

एमटीएस परीक्षेत उमरग्याची संचिता चुंगे राज्यात द्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:33 IST

उमरगा : महाराष्ट्र शासनमान्य एमटीएस राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत उमरग्याने यंदाही यशाची परंपरा कायम राखली असून, येथील दुसरीच्या वर्गातील संचिता ...

उमरगा : महाराष्ट्र शासनमान्य एमटीएस राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत उमरग्याने यंदाही यशाची परंपरा कायम राखली असून, येथील दुसरीच्या वर्गातील संचिता चुंगे राज्यात द्वितीय आली आहे.

कोरोनामुळे या वर्षी दुसरी ते सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यासाठी ही स्पर्धा परीक्षा २५ जुलै २०२१ रोजी ऑनलाइन घेण्यात आली होती. या स्पर्धा परीक्षेत उमरगा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी होतात. गेल्या दहा वर्षांपासून एमटीएस परीक्षेत या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करून उमरगा पॅटर्न निर्माण केला आहे. आजवर संकेत साळुंके, प्रणिता मोरे, चाणक्य बावा, श्रेयश आळंगेकर, पृथ्वीराज फुकटे, सुयश काळे हे विद्यार्थी राज्यात प्रथम, द्वितीय आलेले आहेत. या वर्षी संचिता चुंगे या विद्यार्थिनीने दुसऱ्या एमटीएस परीक्षेत राज्यात द्वितीय येण्याचा मान मिळविला आहे. संचिताने २०० पैकी १९२ गुण मिळविले आहेत.

दरवर्षी उमरगा तालुक्यातून ५० ते ६० विद्यार्थी गुणवत्ता यादीत स्थान मिळवितात. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी. ओएमआर उत्तरपत्रिका कशी असते. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी लहान वयात अभ्यास कसा करावा. अभ्यासात येणाऱ्या अडचणी आणि बुद्धिमत्ता विषयातील कौशल्यावर विद्यार्थ्यांना प्रभुत्व मिळविता येते. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची पाचवी स्कॉलरशिप व आठवी स्कॉलरशिपची पूर्वतयारी होत असल्याने पालकांमधूनही या परीक्षेसाठी चांगला प्रतिसाद आहे.

यांनीही मारली बाजी

कोरोनाकाळात शाळा बंद असूनही तालुक्यातील अडीचशे विद्यार्थी या परीक्षांसाठी बसले होते. यात दुसरीमधून संचिता चुंगे राज्यात दुसरी आली आहे. प्राची धनराज कुडकले ही तिसरीमधून जिल्ह्यात प्रथम, तर अर्णव तोडकर या विद्यार्थ्याने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. ‌तेजस्विनी बळिराम क्षीरसागर, यशराज गडदे आणि अन्वी भुसार (चौथी), तहीनियात शेख, प्रसाद तंगशेट्टी (सहावी), तर उमादेवी बुलबुले व आदित्य मुसांडे (सातवी) यांनीही जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय येण्याचा मान मिळविला आहे. एमटीएस स्पर्धा परीक्षेचे तालुका समन्वयक पद्माकर मोरे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.