कळंब - स्वाभिमानी मराठा महासंघाच्या माध्यमातून समाज संघित करण्यासाठी मराठा जाेडाे अभियान सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नूतन जिल्हाध्यक्ष अमाेल शेळके यांनी दिली.
निवडीबद्दल आयाेजित सत्कार समारंभात ते बाेलत हाेते. यावेळी महासंघाचे राज्य प्रवक्ते विक्रमादित्य मोरे हे उपस्थित होते.
शेळके म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात मराठा समाजातील युवकांना पाठबळ देण्याचे काम संघटना करणार आहे. समाजातील वाढती बेरोजगारी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यासाठी राेजगार मेळावे आयोजित करून हा प्रश्न सोडविण्याचे काम केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यानंतर उपस्थितांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या या निवडीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कृषिराज टकले, मार्गदर्शक शिवशाहीर हभप कल्याण महाराज काळे, शिवशाहीर विजय तनपुरे, स्वाभिमानी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुभाष गागरे, राज्य संपर्क प्रमुख सचिन भोसले, राज्य निरीक्षक अंकुश डांभे, बाळासाहेब निपुंगे, रामकिसन मडके, अनिल सुपेकर, गणेश झगरे, संदीप वहाडणे आदींनी काैतुक केले.