पाथरुड : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महाविकास आघाडीच्या चंद्रकला शिवाजी फाळके तर उपरसरपंचपदी प्रा. तानाजी रामभाऊ बोराडे यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
महाविकास आघाडीचे सदस्य सुरेश तिकटे, अशोक भसाड, बप्पा पवार, धोंडिबा टिळक, सिद्धी बोराडे, विजया तिकटे, शमीमबानो तांबोळी, आश्विनी आठवले यांची यावेळी उपस्थिती होती. भाजपाच्या एकमेव निवडून आलेल्या सदस्या दीपिका खुणे यावेळी अनुपस्थित राहिल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी. एस. इंगळे, ग्रामविकास अधिकारी एस.बी. केंद्रे, ग्रामसेवक एस.एस. शिंदे यांनी काम पाहिले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बलभीम भसाड, धोंडीअण्णा पवार, जि. प. सदस्या संगीता बोराडे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. चेतन बोराडे, राकाँचे तालुकाध्यक्ष विजय बोराडे, माजी उपसरपंच धनंजय बोराडे, गोकुळ तिकटे, वैजिनाथ म्हमाणे उपस्थित होते. सरपंच, उपसरपंच च्या निवडीनंतर फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला.