शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४० ते ४५ टक्के ग्रामपंचायतींत ‘महाविकास आघाडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:23 IST

उस्मानाबाद -राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. यांचे सरकार फार ...

उस्मानाबाद -राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. यांचे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा भाजपाकडून पहिल्या दिवसापासून केला जात आहे. असे असतानाच मध्यंतरी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने एकी दाखवून दिली. सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत मात्र १०० टक्के ग्रामपंचायतींत तिन्ही पक्षांची माेट बांधून ‘महाविकास आघाडी’चा एकच पॅनल देण्यात स्थानिक नेतृत्व यशस्वी हाेऊ शकले नाही. तीनही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी केलेल्या दाव्यानुसार केवळ ४० ते ४५ टक्के ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी लढत देत आहे. मात्र, निकालानंतर अनेक ठिकाणी तिन्ही पक्षांची गट्टी जमून येईल, अशी आशा या मंडळीने व्यक्त केली.

जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली हाेती. यापैकी ४० ग्रामपंचायती बिनिवराेध निघाल्या आहेत. त्यामुळे १५ जानेवारी राेजी ३८८ ग्रामपंचायतींसाठी मतदान हाेणार आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. ही महाविकास आघाडी विधान परिषद निवडणुकीतही दिली. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या आखाड्यातही हे तीन पक्ष एकत्र येत ताकद दाखवतील, असा दावा राज्यपातळीवरील नेत्यांकडून करण्यात आला हाेता. परंतु, प्रत्यक्षात स्थानिक पातळीवरील नेतेमंडळीला या तीन पक्षांची माेट बांधण्यात फारसे यश आलेले नाही. ४० ते ४५ टक्के ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीचे पॅनल एकत्रित लढत आहे, असा दावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात हे प्रमाण कमी आहे. दरम्यान, निवडणूक निकालानंतर अनेक ग्रामपंचायतीत वेगवेगळे लढणारे तिन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, असा विश्वासही या तीनही पक्षांकडून व्यक्त करण्यात आला आहे. असे असले तरी महाविकास आघाडीला विधानसभा, विधानपरिषदेत जे जमले ते स्थानिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत का जमले नाही? हे स्थानिक नेत्यांचे अपयश आहे का? असे एक ना अनेक सवाल उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

चाैकट...

राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. हे सरकार चांगले काम करीत आहे. हेत्र सूत्र जास्तीत जास्त ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्यक्षात यावे, यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात आले. त्याला जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास ५० टक्के ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी लढत देत आहे.

-कैलास पाटील, आमदार तथा जिल्हाध्यक्ष, शिवसेना.

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला माेठे यश मिळाले. त्यामुळे अधिकाधिक ग्रामपंचायतींतही तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढावी, अशी चर्चा झाली हाेती. त्यानुसार प्रयत्नही करण्यात आले. त्यास चांगले यश आले आहे. साधारणपणे ४० ते ४५ टक्के ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढत आहेत.

-ॲड. धीरज पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून ज्या-ज्या निवडणुका झाल्या, त्यांमध्ये तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढत देण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त ग्रामपंचायतींत हा प्रयत्न केला आहे. साधारपणे ४५ ते ५० टक्के ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी म्हणून आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते लढत आहेत. हा प्रयाेगही निश्चित यशस्वी हाेईल.

-सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस.

निकालानंतर बदलू शकते चित्र...

काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीकडून ४० ते ४५ टक्के ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढत आहाेत, असे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात हे प्रमाण एवढे नाही. मात्र, निवडणूक निकालानंतर अनेक ग्रामपंचायतींत हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता काबीज करू शकतात. त्यामुळे निकालानंतर महाविकास आघाडीच्या स्थानिक नेतेमंडळीचा दावा प्रत्यक्षात येऊ शकताे.

पाॅईंटर...

जिल्ह्यातील निवडणूक रणधुमाळी सुरू असलेल्या खासकरून माेठ्या ग्रामपंचायतींत अनेक ठिकाणी शिवसेना व राष्ट्रवादी या दाेनच पक्षात प्रमुख लढत झालेली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी महाविकास आघाडी आकारास येऊ शकली नाही. तसेच काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दाेनच पक्ष प्रबळ आहेत. त्यामुळे अशा ठिकाणीही आघाडी हाेऊ शकली नाही. ज्या ठिकाणी भाजपा प्रमुख विराेधक आहे, अशा बहुतांश ठिकाणी आघाडी दिसते. तर काही काही ठिकाणी आघाडीत फूट पडली आहे.