शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या दिवशीही बत्ती गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:33 IST

मुरुम : उमरगा तालुक्यातील केसरजवळगा गावात मागील तीन दिवसांपासून थ्रीफेजचा वीजपुरवठा बंद असल्याने गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली ...

मुरुम : उमरगा तालुक्यातील केसरजवळगा गावात मागील तीन दिवसांपासून थ्रीफेजचा वीजपुरवठा बंद असल्याने गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.

केसरजवळगा गावाला आलूर येथील ३३ केव्हीच्या वीज उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो. उन्हाळा आला की उपकेंद्रावर भार दुपटीने वाढतो. त्यामुळे थ्रीफेजचा वीजपुरवठा अखंडितपणे होणे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना अशक्यच होते. सध्या या उपकेंद्रातून आलूर, अचलेर, वरनाळ, केसरजवळगा, बोळेगाव या गावांना वीजपुरवठा केला जातो. या उपकेंद्रातून आलूर, केसरजवळगा, अचलेर असे तीन फीडर आहेत. या तिन्ही फिडरवर क्षमतेपेक्षा जास्त भार असल्याने एकाच वेळी तिन्ही गावात वीजपुरवठा देणे महावितरणला आतापर्यंत तरी शक्य झाले नाही. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या तिन्ही ऋतुमध्ये ही समस्या कायम आहे. त्यामुळे महावितरणकडून सध्या चक्राकार पध्दतीने प्रत्येक गावाला वीजपुरवठा केला जात आहे. प्रत्येक गावाला आठ तास थ्रीफेजचा वीजपुरवठा केला जातो. मात्र, तोही अनियमित असतो. कधी बिघाडांच्या दुरुस्तीसाठी तर कधी भार वाढल्याच्या कारणावरून वारंवार वीजपुरवठा अधुनमधून खंडित होत असतो. आठ पैकी किमान तीन ते चार तासच थ्रीफेजचा वीजपुरवठा शेतीपंपाना मिळतो. यात देखिल कधी पावसामुळे बिघाड झाल्याने तर कधी दुरुस्ती करीता वीज वारंवार खंडित होत असते. त्यामुळे थ्रीफेजवर चालणारे पंप व उद्योधंदे बंद राहत असल्याने शेतकरी व नागरीकांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यासोबतच पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे.

सोमवारी वादळी पावसाने खंडित झालेला थ्रीफेजचा वीजपुरवठा गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालू झाला नव्हता. त्यामुळे येथे पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. गावातील नळांना आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत असून, त्यातही विजेचा खेळखंडोबा झाल्यास बारा ते चौदा दिवसानंतर नळांना पाणी येत आहे. यासंदर्भात सरपंच बलभीम पटवारी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आलूर उपकेंद्रातून केला जाणारा थ्रीफेजचा वीजपुरवठा मागील तीन दिवसांपासून बंद आहे. गुरुवारी सायंकाळी चार वाजता सुरु होणारा वीजपुरवठा सहा वाजेपर्यंत बंदच होता. दर पाच मिनिटांनी भार वाढल्याने वीज खंडित होते. त्यामुळे साठवण तलाखालील पाणीपुरवठ्याचे पंप सतत बंद राहात असल्याने गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. विजेच्या कमी दाबामुळे मागील आठ दिवसात कुपनलिकांचे तीन पंप जळाले आहे. वीजपुरवठा सुरळीत व नियमितपणे झाल्यास पाणीटंचाईचा समस्या दूर होईल. यासंदर्भात मुरुम येथील महावितरण कार्यालयातील ग्रामीणचे कनिष्ठ अभियंता सागर सायगावकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांचे मोबाईल नॉटरिचेबल होते.

कोट.....

वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती मला मिळाली नाही. आपल्या माध्यमातूनच थ्रीफेजचा वीज पुरवठा तीन दिवसांपासून बंद असल्याचे समजले. मी माहिती घेऊन सांगतो.

आर. एम. शेंडेकरश उपकार्यकारी अभियंता, उमरगा

क्षमतावाढीचे काम निधीअभावी थांबले

उपकेंद्रावर भार वाढल्याने काही भागातील रोहित्राचा वीजपुरवठा बंद करुन वीजपुरवठा केला जात आहे. तरी देखील समस्या कायम आहे. आलूर उपकेंद्रांची क्षमता वाढ करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात आला आहे. निधीअभावी उपकेंद्रांची क्षमतावाढ करण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून थांबले आहे. यासंदर्भात उमरगा आमदार ज्ञानराज चौगुले म्हणाले, उमरगा व लोहारा तालुक्यातील रोहित्राची क्षमतावाढ करण्याकरीता ऊर्जा विभागाकडून जवळपास १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.