शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरण मोहिमेचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:29 IST

भूम : येथील ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने जंतनाशक औषध वाटप व कोरोना लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक संदीप जोगदंड ...

भूम : येथील ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने जंतनाशक औषध वाटप व कोरोना लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक संदीप जोगदंड व तालुका वैद्यकीय अधिकारी अमोल शिंगारे यांनी १ मार्चपासून जंतनाशक औषध वाटपाची मोहीम सुरू केली असून, ती ८ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. ०१ ते १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींनी ही जंतनाशक गोळी घ्यावी, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील खासगी व शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांनाही जंतनाशक गोळ्या दिल्या जात आहेत. मात्र, ०१ ते १० वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांची शाळा सुरू नसल्याने प्रभागनिहाय कर्मचारी नेमून प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जंतनाशक गोळ्या पोहोच केल्या जात असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक संदीप जोगदंड यांनी दिली.

दरम्यान, १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली असून, आजवर १,५६० नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. यातील एकाही नागरिकाला कसलाही त्रास झालेला नसल्याचेही डॉ. जोगदंड यांनी सांगितले.