शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

खंडेश्वरवाडी प्रकल्पाची डागडुजी रखडली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:29 IST

(फोटो : विजय माने २५) परंडा : तालुक्यातील खांडेश्वरवाडी पाटबंधारे प्रकल्पाच्या भरावाला मागील वर्षी भेगा पडल्याने तातडीचा उपाय म्हणून ...

(फोटो : विजय माने २५)

परंडा : तालुक्यातील खांडेश्वरवाडी पाटबंधारे प्रकल्पाच्या भरावाला मागील वर्षी भेगा पडल्याने तातडीचा उपाय म्हणून धरणाचा सांडवा फोडून व कालव्याद्वारे पाणी सोडून पूर्ण धरण रिकामे करण्यात आले होते. मात्र, गेल्या वर्षभरामध्ये या भरावाच्या दुरुस्तीचे काम हाती न घेतल्याने धरणाच्या भरावाची परिस्थिती अजूनही ‘जैसे थे’ आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून, हा अंदाज खरा ठरल्यास या पावसाळ्यात धरण फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे.

तालुक्याच्या उत्तर भागामध्ये सिंचनाचे मुख्य स्त्रोत म्हणून या धरणाकडे पाहिले जाते. धरण लाभ क्षेत्राअंतर्गत सहा हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. खंडेश्वरवाडी धरण गेल्या पावसाळ्यात पूर्णक्षमतेने भरले होते. त्यावेळी आनंदाने भारावून जाऊन या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठा जल्लोष केला होता. मात्र, हा जल्लोष काही काळापुरताच मर्यादित राहिला. ऐन पावसाळ्याच्या उत्तरार्धात धरणाच्या माती बंधाऱ्याला मोठमोठ्या भेगा पडल्याने धरण फुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. पाटबंधारे विभागाने संभावित धोका पाहता पोकलेन यंत्राच्या माध्यमातून सांडवा फोडून धरणातील पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता. धरण पट्ट्यातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने कालवा फोडून धरण रिकामे करण्यात आले होते. धरण रिकामे झाल्याने याचा सर्वाधिक फटका लाभ पट्ट्यातील शेतकऱ्यांना बसला होता.

धरणाला शिवसेनेचे उपनेते आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांनी भेट देऊन पाहणी करत धरणाच्या माती बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, पाटबंधारे विभागाने गेल्या वर्षभरात कुठलीही हालचाल केली नाही. शेवटी १८ मार्च रोजी विश्व मराठा संघटनेच्या वतीने तहसीलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पावसाळ्यापूर्वी भरावाच्या दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने हा विषय गांभीर्याने न घेतल्याने आजमितीला या धरणाला धोका निर्माण झाला आहे.

240721\0132img-20210721-wa0013.jpg

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर भेगा पडलेल्या ठिकाणी प्लॅस्टिक कागद अंथरूण  बंधाऱ्याची सुरक्षा प्रदान करण्याचा कोविलवाना प्रयत्न संबंधीत विभागाकडून करण्यात आला आहे