उस्मानाबाद - तुळजापूर तालुक्यातील जळकाेट येथून जवळच असलेल्या बोरमन तांडा येथे हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त येथील चौकास संत सेवालाल यांचे नाव देऊन सरपंच अशोक पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख कृष्णात मोरे, बाजार समितीचे माजी सदस्य हरीश जाधव, वैभव जाधव, गोर सेनेचे दिलीप जाधव, उपाध्यक्षपदी लखन चव्हाण, सरचिटणीस कुमार राठोड, तालुकाध्यक्ष राजू चव्हाण, बंजारा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष भीमराव राठोड, ग्रामपंचायत सदस्य अंकुश लोखंडे, अनिल छत्रे, संजय अंगुले, संजय माने, लोकू राठोड, वसंत चव्हाण, राजू राठोड, रूपचंद राठोड, मोहन राठोड, सुभाष राठोड, रामराव राठोड, मिथुन राठोड, अनिल राठोड, वसंत महाराज, विकास चव्हाण, सुधाकर राठोड, सचिन राठोड, राहुल राठोड, आदी उपस्थित हाेते.