अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा बाबई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या अणदूर बिटच्या सुपरवायझर खरात उपस्थित होत्या. यानंतर १५ अंगणवाडींना माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमा भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माया जाधव, सुरेखा बेडगे, श्रीदेवी करपे, नागिनी सदाफुले, राहिबाई सोनकवडे, सुरेखा वाघे, विशाखा मुकरे, उलन आलुरे, विजया कंदले, सिंधुबाई ढवळे, राधिका बारगळ, वैजयंता बोगंरगे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक विद्या चव्हाण यांनी तर आभार सुरेखा बेडगे यांनी मानले.
(फोटो - १२)
श्रीपतराव भोसले हायस्कूल, उस्मानाबाद
उस्मानाबाद : येथील श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन प्राचार्य एस. एस. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक एस. बी. कोळी, पर्यवेक्षक वाय. के. इंगळे, के. वाय. गायकवाड, टी. पी. शेटे, डी. ए. देशमुख, समन्वयक आर. बी. जाधव, आर. एन. नन्नवरे, टी. पी. हाजगुडे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
(फोटो - १२)
श्री संत गाडगे महाराज अनाथाश्रम
कळंब : येथील श्री संत गाडगे महाराज अनाथाश्रमात राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेचे पूजन बहुजन विकास मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल हौसलमल, अजय पारवे, अजिंक्य रणदिवे, बळी चव्हाण, विठ्ठल काटकर, बंटी जगताप, सतीश पवार, संस्थेचे रवी शिंदे आदींच्या हस्ते करण्यात आले.