शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

११ नंतर बाहेर पडल्यास होणार कोरोनाची चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:32 IST

भूम : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात सकाळी ११ वाजल्यानंतर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने ...

भूम : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात सकाळी ११ वाजल्यानंतर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या अनुषंगाने तयारीदेखील करण्यात आली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने राज्यात अनेक निर्बंध लावले आहेत. परंतु, बहुतांश नागरिक महत्त्वाचे काम नसतानाही मुक्तपणे वावरताना दिसत आहेत. यामुळे निर्बंध लावूनही कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. यामुळे पालिका गटनेते संजय गाढवे, वैद्यकीय अधीक्षक संदीप जोगदंड व भूम पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवी यांच्या वतीने येथील ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी बैठक घेण्यात आली. यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांबाबत चर्चा होऊन सकाळी ११ वाजल्यानंतर विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या उपक्रमाची सुरुवातदेखील करण्यात आली.

या कोरोना चाचणीत एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह असल्यास त्याला परंडा रोडवरील कोरोना सेंटर येथे तातडीने दाखल करण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने सुरू करण्यात आली असून, पहिल्या दिवशी या पथकाच्या माध्यमातून दुपारी २ वाजेपर्यंत १५ नागरिकांची अँटिजेन तपासणी करण्यात आली. यामध्ये एकही रुग्ण निष्पन्न झाला नसल्याचे सांगण्यात आले. ही मोहीम नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी सुरू केली आहे. ही मोहीम शहरातील प्रत्येक वाॅर्डात ३० एप्रिलपर्यंत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवी यांनी दिली.

कोट........

नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरून आपल्यासह इतरांचाही जीव धोक्यात आणू नये, हाच या मोहिमेचा उद्देश आहे. यामुळे शहरातील नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करावे.

- संजय गाढवे, गटनेते

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आजच्या स्थितीत बऱ्याच ठिकाणी नागरिकांना खासगी दवाखान्यातदेखील बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन घरातच थांबावे, यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये.

- डॉ. संदीप जोगदंड, वैद्यकीय अधीक्षक