शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘उसे तो बस इन्सानों मे इन्सान दिखता था’

By admin | Updated: July 29, 2015 00:47 IST

उस्मानाबाद : अणुशक्ती व क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या अग्निपंखांना स्वदेशीचे बळ देणारे, भारतीय धर्मनिरपेक्षतेचे मूर्तीमंत प्रतिक

उस्मानाबाद : अणुशक्ती व क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या अग्निपंखांना स्वदेशीचे बळ देणारे, भारतीय धर्मनिरपेक्षतेचे मूर्तीमंत प्रतिक माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे सोमवारी रात्री निधन झाले. देशवासियांत अत्यंत लोकप्रिय असलेल्या कलाम यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला. आपल्या या आवडत्या व्यक्तिमत्वास अनेकांनी आपल्या शब्दफुलांव्दारे श्रद्धांजली वाहिली. मंगळवारी दिवसभर वॉटस्अप , फेसबुक तसेच इतर सोशल माध्यमावर डॉ. कलाम यांच्या कर्तृत्वाला उजाळा देणाऱ्या तसेच त्यांना अभिवादन करणाऱ्या पोस्टचा पाऊस पडला होता.डॉ. अब्दुल कलाम यांचा सर्वस्तरातील वर्ग चाहता होता. अगदी शाळकरी विद्यार्थ्यांपासून जेष्ठ मंडळींनाही कलाम यांनी आयुष्यभरात केलेल्या उतुंग कामांचा नेहमीच आदर राहिलेला आहे. त्यातच कलाम यांचे व्यक्तिमत्व सर्वसामान्यांना भावणारे असल्याने त्यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता. त्याचाच प्रत्येय मंगळवारी सोशल मिडियावर येत होता.जिन्होने अपने जीवन की शुरुवात,लोंगो के घर अखबार डालकरकी थी... आज उन्ही की खबर, दुनिया के हर अखबार मे है ।मंगळवारी सर्वच वर्तमानपत्रात कलाम यांच्या निधनाचे वृत्त झळकल्यानंतर कलाम यांनी आयुष्याच्या प्रारंभी सोसलेल्या यातनांचीही अनेकांना आठवण झाली. अत्यंत कष्टातून कलाम यांनी आपले आयुष्य घडविले होते. भारताला परमाणू क्षेत्रात स्वबळ निर्माण करुन देणाऱ्या कलाम यांच्या सर्वधर्मियांच्या प्रथा-परंपरांचा आदर करण्याच्या स्वभावाचीही अनेकांना आज प्रकर्षाने आठवण झाली. त्यामुळे जो देता था एकता का पैगाम, वह कलाम चला गया..जिसने दिया देश को परमाणू सलाम, ओ कलाम चला गया...अशा शब्दात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कलाम म्हणजे सर्वधर्मसमभावाचे मूर्तीमंत उदाहरण होते. भारतीय हीच ओळख त्यांची कायम होती. या त्यांच्या गुणांचीही मंगळवारी श्रध्दांजली वाहताना अनेकांना आठवण आली.ना हिंदू दिखता था, ना मुसलमान दिखता था उसे तो बस इन्सानों मे, इन्सान दिखता थाहो गई आज खामोश, वो आवाज सदा के लिएजिसकी बातो में केवल, हिंदुस्थान दिखता था ।इन्सानों मे इन्सान बघणाऱ्या कलांमाना आदरांजली वाहताना त्यांचे विचार आत्मसात करण्याची आज खरी गरज आहे. कलाम यांनी संशोधनासह इतर विविध क्षेत्रात दैदिप्यमान कार्य करुन भारतीयांसमोर मोठा आदर्श घालून दिला आहे. त्यामुळेच कलाम यांच्या निधनानंतर अनेकांनी कुदरत भी फुट फुट के रोया है..आज देशने कलाम खोया है ।लगा सका न कोई उसके कद का अंदाजा..वह आसमा था मगर सर झुकाये हुआ था ।।अशा शब्दात आदरांजली वाहिली. कलाम यांनी देशाची प्रचंड सेवा केली. शास्त्रज्ञ ते भारताचे राष्ट्रपती असा मोठा यशाचा पल्ला त्यांनी गाठला. मात्र त्यानंतरही त्यांनी साधेपणा जपला. या त्यांच्या स्वभावाची अनेकांना भूरळ होती. त्यामुळेच ‘वह आसमा था.. मगर सर झुकाये हुआ था’ अशा शब्दात त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांची मांडणी केली.‘आओ झुक कर सलाम करे उन्हेजिनके हिस्से में मुकाम आया है ।खुश नशिब होता है ओ लहु जो देश के काम आया है ।।काहींनी अशा शब्दात तर काहींनी वो ‘कलाम’ नही कमाल थे..मिसाईलमॅन वो बेमिसाल थे ।उनकी खुबिया करती रहेगी, पथप्रदर्शन मेरावो मेरी मातृभूमी की ढाल थे ।अशा पध्दतीने कलाम यांनी देशासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. सोशल मिडीयावर हिंदीसह इतर भाषेतून कलाम यांच्या आठवणींसह त्यांनी देशासाठी दिलेल्या योगादानाची माहिती देण्यात येत होती. यात मराठीतून येत असलेल्या संदेशांची संख्याही लक्षवेधी होती. नभ पंखात दडला तारा चमचमता अंगार उरी विजला निखारा लखलखता,दिले प्रकाश ज्याने जगतास आयुष्यभर निस्वार्थ केली सेवा मी पणा मुळी नव्हता,ते अग्निपंख तुटले सारा देश व्याकुळलाआज तुमच्या जाण्याने सारा भारत रडला.तर काहींनीदेशासाठी महान योगदान ना सोडले कधी ज्ञानदानजगात भरुन त्यांंची किर्ती संयमी सफल होते राष्ट्रपतीचटका लावून गेले मनास, ना होणे कोणी डॉक्टर कलामकर्तृत्वास त्यांच्या माझा सलाम..!अशा शब्दात कलाम यांना श्रध्दांजली अर्पण केली. कलाम यांनी एवढ्या मोठ्या पदावर जावूनही साधेपणा जपला होता. त्यांच्या अंतिम काळातही त्यांनी समाजातील शेवटच्या घटकाशी असलेली आपली नाळ आजही तुटलेली नसल्याचेच एका सैनिकाशी संवास साधून दाखवून दिले होते. माणसा-माणसाला जोडणाऱ्या या आपल्या माजी राष्ट्रपतीकडून आपण एवढा एक गुण घेतला तरी समाजात मोठा बदल होवू शकतो. हे सांगण्यासाठी एकाने ‘तू माणसात आहे, रे जोड माणसानां’ असा संदेश या शब्द सुमनांच्या माध्यमातून दिला आहे.‘सोडून जात आहे मी धर्म माणसांना सांगेल कबर माझी हे कर्म माणसांनातु माणसात आहे, रे जोड माणसाना..!