शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

लाेहारा नगर पंचायतीच्या नाड्या प्रशासकाच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:34 IST

लोहारा : लोहारा नगरपंचायतची मुदत ६ मे संपल्याने जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उमदले यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली ...

लोहारा : लोहारा नगरपंचायतची मुदत ६ मे संपल्याने जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उमदले यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.

लोहारा नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम झाला आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या ३० मार्चच्या आदेशानुसार लोहारा नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता मतदार यादी कार्यक्रम २०२१-२२ घेण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाप्रमाणे नगरपंचायतीच्या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदार यादीवर १९ ते २९ एप्रिलपर्यंत हरकती व सूचना शहरातील जनतेकडून मागविण्यात आल्या. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यभर वाढत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने सर्वच निवडणूका रद्द केल्या. त्यात लोहारा नगरपंचायतची निवडणूक ही रद्द झाली. परिणामी विद्यमान नगराध्यक्षा ज्योती मुळे, उपनगरध्यक्ष प्रताप मुळे यांच्यासह सर्वच नगरसेवकांचा कार्यकाळ ६ मे रोजी गुरुवारी संपला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी लोहारा नगरपंचायतच्या प्रशासकपदी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उमदले यांची नियुक्ती केली आहे. ७ मे रोजी पदभार स्वीकारण्याच्या सूचना ही देण्यात आल्या आहेत.