शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जिजाऊ जयंतीनिमित्त अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:25 IST

छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा : येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या मानवी हक्क विभाग आणि महिला सबलीकरणाच्या वतीने राजमाता जिजाऊ ...

छत्रपती शिवाजी महाविद्यालय

उमरगा : येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या मानवी हक्क विभाग आणि महिला सबलीकरणाच्या वतीने राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. जी. एच. जाधव जाधव, उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, डॉ. संजय अस्वले, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विनोद देवकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बापू मोरे, डॉ. व्ही. एस. सूर्यवंशी, डॉ. ए. एस. पदमपल्ले, प्रा. एस. डी. गावीत आदी उपस्थित होते.

मलंग विद्यालय

उमरगा : येथील कै. शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अजित गोबारे तर प्रमुख पाहुणे म्हणून कुमारस्वामी प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक कविराज रेड्डी उपस्थित होते. रेड्डी यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन परमेश्वर सुतार यांनी केले. आभार बालाजी हिप्परगे यांनी मानले. कार्यक्रमासाठी राजकुमार जाधव, अगतराव मुळे, सतीश कटके, परमेश्वर कोळी, मीनाक्षी हत्ते, कलशेट्टी पाटील, मोहन साखरे आदींनी पुढाकार घेतला.

पारगाव ग्रामपंचायत

पारगाव : येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी प्रवीण देशमुख यांच्या उपस्थितीत महिला सफाई कामगार रुक्मिणी गायकवाड यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास पद्मिन खंडागळे, ॲड. विजय मोटे, आर. ए. डोके, मनोज औताने, दीपक गायकवाड, ध्रुव देशमुख आदी उपस्थित होते.

शिवशक्ती विद्यालय

उमरगा : एकुरगा येथील श्री शिवशक्ती विद्यालयात ज्ञानविकास शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश बोंडगे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अजित साळुंके, धनराज पाटील, सिद्धेश्वर वाकडे, महादेव करके, दत्तू कांबळे, शिवाजी चेंडके उपस्थित होते. आभार अजित साळुंके यांनी मानले.

जि. प. हायस्कूल, उमरगा

उमरगा : येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्कृतिक विभागप्रमुख सरिता उपासे व क्रीडाशिक्षक बाबासाहेब जाधव यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. प्रशालेतील अटल इन्चार्ज बशीर शेख, संजय रूपाजी, चंद्रशेखर पाटील, बलभीम चव्हाण, सुनीता राठोड व नववी-दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.

फक्त फोटो :

छत्रपती शिवाजी विद्यालय, बलसूर

उमरगा तालुक्यातील बलसूर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी राजेंद्र चव्हाण, बळीराम नांगरे आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायत कार्यालय, दाळिंब

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त दाळिंब ग्रामपंचायत कार्यालयात प्रशासक करदंटे यांच्या हस्ते मंगळवारी प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी आशा सेविका, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होत्या.

नंदुराम प्राथमिक आश्रमशाळा

उमरगा तालुक्यातील बलसूर येथील नंदुराम प्राथमिक आश्रमशाळेत मुख्याध्यापक तात्याराव चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी भारत कांबळे, अनिल चव्हाण, विजय जाधव आदी उपस्थित होते.