परंडा : अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील व विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे-पाटील यांचा येथे सत्कार करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत छावा संघटनेची पुढील दिशा काय असेल, हे निश्चित करण्यासाठी जावळे-पाटील सध्या महाराष्ट्र दौरा करीत आहेत. छावा संघटनेच्या वतीने ९ ऑगस्ट या क्रांती दिनापासून याबाबत ठोस भूमिका घेण्यात येणार आहे. यानिमित्त परांड्यात नानासाहेब जावळे-पाटील आले असताना तालुका छावा संघटना व श्रीमंतराजे प्रतिष्ठान (कपिलापुरी) यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष भरत ननवरे, तालुका कार्याध्यक्ष तथा श्रीमंतराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजीत पाटील, युवक तालुका अध्यक्ष महेश्वर खराडे, युवक तालुका सचिव श्रीराम खराडे, लोणी सर्कल प्रमुख उत्रेश्वर शिंदे, आप्पा तरटे आदी उपस्थित होते.
श्रीमंतराजे प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:22 IST