शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल चोरांची टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:22 IST

उस्मानाबाद : संपूर्ण जिल्ह्यात धुमाकूळ घातलेल्या डिझेल चोरांच्या टोळीला अखेर सोमवारी गुन्हे शाखेने वेसण घातले आहे. चार जणांची टोळी ...

उस्मानाबाद : संपूर्ण जिल्ह्यात धुमाकूळ घातलेल्या डिझेल चोरांच्या टोळीला अखेर सोमवारी गुन्हे शाखेने वेसण घातले आहे. चार जणांची टोळी ताब्यात घेऊन त्यांच्याकडील सुमारे १० लाखांचा मुद्देमालही तातडीने हस्तगत केला. या टोळीने आतापर्यंत ८ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा, उस्मानाबाद, कळंब, वाशी तालुक्यासह महामार्गालगतच्या महत्त्वाच्या ठिकाणी गुन्हे घडवून आणले आहेत. उस्मानाबादसह शेजारच्या लातूर जिल्ह्यातही सोलापूरहून इंधनाचे टँकर नियमित जात असतात. अशा टँकर्सवर पाळत ठेऊन रात्रीच्या वेळी त्यातील डिझेल चोरण्याचे प्रकार वाढले होते. यासंदर्भाने नजीकच्या काळात कळंब, येरमाळा, ढोकी, आनंदनगर, उमरगा, वाशी ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. या टोळीचा बंदोबस्त करण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांनी गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना केल्या. गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन घाडगे यांच्यासह उपनिरीक्षक पांडुरंग माने व कर्मचाऱ्यांनी खबऱ्यांची मदत घेत एका टोळीचा माग काढला. ही टोळीच असे गुन्हे घडवून आणत असल्याची खात्री झाल्यानंतर सोमवारी आरोपी भास्कर शहाजी शिंदे, सुंदर बबन शिंदे, तथन बबन शिंदे व आबा शहाजी काळे (सर्व रा.गायरान पेढी, इटकूर, ता.कळंब) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता ८ गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली तसेच त्यांच्याकडील डिझेल, टँकर, रोकड, वाहतुकीसाठी वापरलेली कार असा एकूण ९ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखेने जप्त केला आहे. आरोपींना पुढील तपासासाठी गुन्हे दाखल असलेल्या पोलीस ठाण्यांच्या स्वाधीन करण्यात येत आहे.

बनावट चावीने उघडायचे पाईप...

आरोपी हे प्रामुख्याने महामार्गावर थांबलेल्या टँकर्सना आपले लक्ष्य बनवत होते. जेवणासाठी किंवा विश्रांतीसाठी चालकाने वाहन थांबविले की लागलीच ही टोळी बनावट चावीने पाईपचे लॉक उघडून त्यातून स्वत:कडील पाईप जोडून डिझेल काढायचे व टँकमध्ये भरून तेथून पळ काढायचे.