शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

कोविड रुग्णवाहिकांना रिलायन्स समूहाकडून मोफत इंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:34 IST

आज उमरगा येथुन शुभारंभ. उमरगा : कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णवाहिकेसाठी येणारा अवाढव्य खर्च कमी करावा या हेतूने रिलायन्स पेट्रोलियम ...

आज उमरगा येथुन शुभारंभ.

उमरगा : कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णवाहिकेसाठी येणारा अवाढव्य खर्च कमी करावा या हेतूने रिलायन्स पेट्रोलियम कंपनीच्या वतीने अशा रुग्णवाहिकांसाठी आता मोफत इंधन पुरविले जाणार आहे. याचा शुभारंभ मंगळवारी येथील रिलायन्स पेट्रोलपंपावर आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील, किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

सध्या कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत अनेक गरजू रुग्णांना रुग्णवाहिकेची गरज भासत आहे. परंतु, यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे रिलायन्स पेट्रोलियमद्वारे कोरोनाग्रस्त रुग्णांना घेऊन जाणाऱ्या खाजगी व शासकीय रुग्णवाहिकांना दररोज ५० लिटर याप्रमाणे मोफत इंधन देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. सुरुवातीला सदर उपक्रम केवळ मोठ्या शहरात राबविण्यात येत होता. परंतु, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागातही वाढत असल्याने व खरी गरज ग्रामीण भागातील रुग्णांना असल्याने ग्रामीण भागातही हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील या उपक्रमाचा शुभारंभ उमरगा येथून करण्यात आला.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, उमरगा रिलायन्स पेट्रोलपंपाचे संचालक विक्रम माणिकवार, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे समन्वयक रमाकांत जोशी, डॉ.वसंत बाबरे, १०८ रुग्णवाहिका समन्वयक जयराम शिंदे, नगरसेवक पंढरीनाथ कोणे, युवा सेना माजी तालुकाप्रमुख योगेश तपसाळे, माजी नगरसेवक विवेक हराळकर, शरद पवार, राघवेंद्र माणिकवार, पेट्रोलपंप व्यवस्थापक सिद्धेश्वर मुर्गे, शाहूराज माने आदी उपस्थित होते.

चौकट......

गरजूंना माफक दर आकारावा

उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालय, मुरूम व लोहाऱ्यातील ग्रामीण रुग्णालय, सास्तूरचे स्पर्श ग्रामीण रुग्णालय येथील रुग्णवाहिका व १०८ च्या रुग्णवाहिका, कोरोना रुग्णांसाठी मागील काही दिवसांपासून सेवा देणाऱ्या शिवसेनेच्या ३ रुग्णवाहिका तसेच इतर खाजगी रुग्णवाहिका यांना या उपक्रमाचा लाभ देण्यात आला. दरम्यान, खाजगी रुग्णवाहिकांनाही मोफत इंधन मिळत असल्यामुळे गरजू रुग्णांकडून माफक दर घेण्याच्या सूचना आ. चौगुले यांनी यावेळी केल्या.