वशी तालुक्यातील तेरखेडा ही माेठी ग्रामपंचायत आहे. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी तसेच शिवसेनेने झाेकून दिले हाेते. मतदानापूर्वीच राष्ट्रवादीचे दाेन तर सेनेचे १ उमेदवार बनिवराेध निवडून आले हाेते. त्यामुळे १२ राजगेसाठी शुक्रवारी मतदान झाले. एकूण पंधरा उमेदवार निवडणूक रिंगणात हाेते. मतदारांना आपला हक्क बजावता यावा यासाठी पाच मतदान केंद्रांचे नियाेजन केले हाेते. वाॅर्ड क्र. ५ मधील केंद्रावर मतदान यंत्रातील तांत्रिक बिघाडामुळे जवळपास अर्धा तास उशिराने मतदान सुरू झाले. या सर्व केंद्रांवर मिळून ४ हजार ११५ मतदारांनी हक्क बजावला.
(चाैकट)
तेरखेडा ग्रामपंचायतीच्या वाॅर्ड क्र.१ मध्ये १ हजार २९८ मतदार हाेते. यापैकी ९५४ मतदान झाले. तसेच वाॅर्ड क्र. २ मधील १०३६ पैकी ८२६, वाॅर्ड क्र. ३ मधील १०९९ पैकी ९६४, वाॅर्ड क्र. ४ मधील ८६२ पैकी ६७४ तर वाॅर्ड क्र. ५ मधील १०६७ पैकी ७९७ मतदान झाले आहे.