शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्यांमध्ये महालक्ष्मीचा सण उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:38 IST

कळंब : तालुक्यातील डिकसळ येथील अंगणवाडीमध्ये एकविसाव्या शतकातील ‘लक्ष्मी’ म्हणून दोन विद्यार्थिनींना मान देण्यात आला. या वेळी विद्येचे प्रतीक ...

कळंब : तालुक्यातील डिकसळ येथील अंगणवाडीमध्ये एकविसाव्या शतकातील ‘लक्ष्मी’ म्हणून दोन विद्यार्थिनींना मान देण्यात आला. या वेळी विद्येचे प्रतीक असलेले पुस्तक हाती घेऊन या विद्यार्थिनी गौरीच्या रूपात उभ्या होत्या. सध्या सुरू असलेल्या पोषण मासाच्या अनुषंगाने तालुक्यात असे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.

एकात्मिक बालविकास विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या अंगणवाडीमध्ये कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी यंदाचा महालक्ष्मी सण साजरा करताना विविध नवोपक्रम राबवले आहेत. शिक्षण घेतलेली मुलगी ही खऱ्या अर्थाने २१ व्या शतकातील लक्ष्मीच आहे. याशिवाय बालक व मुलीच्या शिक्षण, आरोग्य, आहारासंबंधी जाणीवजागृती होणे गरजेच आहे. या उद्देशाने असे उपक्रम राबवण्यात आले आहेत.

यात डिकसळ येथील अंगणवाडी क्रमांक ११७ मध्ये कार्यरत असलेल्या अंगणवाडीसेविका आशा जाधव व मदतनीस खंदारे यांनी आपल्या अंगणवाडीत प्रतीकात्मक स्वरूपात दोन विद्यार्थिनींंना महालक्ष्मी स्वरूपात उभे करून गौरी गणपतीचा सण साजरा केला. या वेळी समृद्धी जाधव व समीक्षा जाधव या दोन विद्यार्थिनींंच्या हातात विद्येचे प्रतीक असलेले पुस्तक देण्यात आले होते. याशिवाय इतरही अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी असे विविध उपक्रम राबवले असल्याचे प्रकल्प अधिकारी वैशाली सांगळे यांनी सांगितले. ईटकूर येथील अंगणवाडीमध्ये बालकांचे पोषण, कुपोषण, आहार, आरोग्याची काळजी घेणारे संदेश महालक्ष्मीच्या आरासात मांडण्यात आले होते.

चौकट....

इतर गावांंतही जनजागृतीवर भर...

महिला व बालविकास विभाग सध्या पोषण माह राबवत आहे. यानुसार महालक्ष्मी सणाचे औचित्य साधून तालुक्यातील ईटकूर येथील अंगणवाडी क्रमांक १०४ च्या अंगणवाडी सेविका कस्तुरा अस्वले, अंगणवाडी क्रमांक ४०८ च्या संगीता फरताडे, आढळा येथील शाहू कोकणे, केरूबाई वायसे आदींनी महालक्ष्मी आरासात बेटी पढाओ, बेटी बचाओ, कुपोषण मुक्ती, सकस आहार यासंदर्भातील जनजागृती करणारी सजावट केली आहे.