उस्मानाबाद : एका दुचाकीस्वारास मागून आलेल्या दुचाकीवरून दोन व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून सोन्याची साखळी, मोबाईल व रोकड हिसकावून घेतली. ही घटना उस्मानाबाद शहरात २३ जानेवारी रोजी घडली. तुळजापूर येथील विष्णू माने हे २३ जानेवारी रोजी दुचाकीने प्रवास करीत होते. दुचाकी तुळजापूर रस्त्यावरील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर उभी करून लघुशंकेसाठी थांबले. यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकी क्र. एमएच २५-५८४५ दोन अज्ञात पुरुषांनी विष्णू माने यांना चाकूचा धाक दाखवून त्याच्यासह पाठीवरील बॅगची झडती घेतली. अंगावरील १० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, मोबाईल, मनगटी घड्याळ व २१ हजार ३०० रुपये हिसकावून घेतले. त्याचबरोबर माने यांच्या दुचाकीची चावीही सोबत घेऊन गेले, माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरुद्ध उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
भिंत पाडून विद्युत पंप, लोखंडी गज केला लंपास
उस्मानाबाद : शेतातील खोलीची भिंत पाडून आतील विद्युत पंप, लोखंडी गज, पार्टीशन पत्रे चोरट्यांनी चोरुन नेले. ही घटना उमरगा तालुक्यातील कंटेकूर येथे १२ व १३ जानेवारी रोजी घडली.
कंटेकूर येथील लक्ष्मण पाटील यांची शेतातील साहित्य ठेवण्यासाठी खोली आहे. या खोलीची भिंत अज्ञात चोरट्यांनी पाडून आतील ३ अश्वशक्तीचा विद्युत पंप, २० फुटी लोखंडी गज व १२ पार्टीशन पत्रे चोरुन नेले, अशी फिर्याद पाटील यांनी मुरुम पोलीस ठाण्यात दिली. यावरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध २४ जानेवारी रोजी गुन्हा नोंद झला आहे.