शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कुटुंबाला मिळाली अन्नधान्याची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:34 IST

सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील मैदानात अनेक वर्षांपासून १५ कुटुंबे पाल ठोकून वास्तव्य करीत आहेत. या भागातील गावांत भटकंती ...

सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील मैदानात अनेक वर्षांपासून १५ कुटुंबे पाल ठोकून वास्तव्य करीत आहेत. या भागातील गावांत भटकंती करून महिला चाळण्या, टोपली विकतात, तर पुरुष भंगार गोळा करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. भटकंतीवरच या १५ कुटुंबीयांच्या रोजीरोटीचा प्रश्न अवलंबून आहे. याबाबतचे वृत ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत या भटक्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी तामलवाडी पोलीस ठाण्यातील खाकी वर्दीतला दानशूरपणा जागा झाला. सपोनि सचिन पंडित यांनी मदत करण्यासंबंधीची इच्छा सावरगावचे सरपंच रामेश्वर तोडकरी यांना बोलून दाखविली. तसेच याबाबत नियोजन करण्यात आले. सरपंच तोडकरी यांनी या कुटुंबांची नावे, कुटुंबनिहाय संख्या याची माहिती घेतली. त्यानुसार, सोमवारी सपोनि सचिन पंडित व सरपंच रामेश्वर तोडकरी यांच्या हस्ते या कुटुंबीयांना किराणा सामान, अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी जि.प. सदस्य राजकुमार पाटील, सचिन पंडित, सरपंच रामेश्वर तोडकरी, उपसरपंच आनंद बोबडे, पोलीस पाटील समाधान डोके, शंकर शिंदे, भागवत डोलारे, परमेश्वर काळदाते, नेताजी कदम, सुरज ढेकणे, बाळासाहेब डोके, महेश गवळी, राजकुमार बोबडे, राजाभाऊ ठाकूर, दादा काडगावकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

चौकट

‘लोकमत’च्या वृत्ताने ‘त्या’ कुटुंबांना मिळाली मदत

सावरगाव येथे निवासी असलेल्या १५ कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न लाॅकडाऊनमुळे गेल्या महिनाभरापासून गंभीर बनला होता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्यामुळे आम्हाला मदत करण्याची इच्छा झाली. त्यानुसार, सोमवारी या १५ भटक्या कुटुंबीयांना अन्नधान्याची मदत केली.

- रामेश्वर तोडकरी,

सरपंच, सावरगाव