शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

महामारीतही लाचखोरी, अवैध ‘महसूल’ सापळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:23 IST

उस्मानाबाद : कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असले त्याचा कसलाही परिणाम लाचखाेरांवर झालेला दिसत नाही. अगदी लॉकडाऊन काळातही लाचखोरी ...

उस्मानाबाद : कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असले त्याचा कसलाही परिणाम लाचखाेरांवर झालेला दिसत नाही. अगदी लॉकडाऊन काळातही लाचखोरी जोमातच सुरू आहे. चालू वर्षाच्या अवघ्या ५ महिन्यांतच तब्बल १४ कारवाया झाल्या आहेत. यात महसूल, पंचायत व शिक्षण विभाग अग्रेसर आहेत.

दणक्यात कारवाया होत असतानाही लाचखोरी थांबण्याचे नाव घेत नाही. गतवर्षीचे दीर्घ लॉकडाऊन व त्यामुळे खोळंबून पडलेली कामे तसेच इतरही कामे करून देण्याच्या मोबदल्यात लाच घेताना सरकारी अधिकारी-कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत. चालू वर्षात शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या दोन मुख्याध्यापकांवर लाच घेताना कारवाई झाली आहे. यापाठोपाठ महावितरणमधील सहायक अभियंत्यासह इतरांवरही ट्रान्सफार्मर बदलून देण्यासाठी ५५ हजारांची लाच घेताना कारवाई झाली. महसूल विभागात एक कोतवाल व नायब तहसीलदारही लाच घेताना दोन वेगवेगळ्या प्रकरणात अडकले. यासोबतच कृषी विभागातील कृषी सहायक, आरटीओ एजंट, दोन पोलीस, नोंदणी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक जाळ्यात अडकले, तर पंचायत विभागातील ग्रामसेविका व अन्य प्रकरणात सरपंच लाच घेताना लाचलुचपत विभागाने सापळ्यात अडकविले.

कोणत्या वर्षात किती कारवाया...

२०१८ : ३१

२०१९ : २५

२०२० : १४

कोरोनाकाळातही सरकारी वरकमाईची धूम...

महावितरण : ३

महसूल : ५

पोलीस : ५

नोंदणी विभाग : २

आरटीओ : २

कृषी : १

लघुपाटबंधारे : १

शिक्षण : २

पंचायत विभाग : ४

प्रकरणे उघडी करण्यात शेतकरी पुढे...

लाचखोरीचे सर्वाधिक शिकार हे शेतकरीच ठरत आहेत. शिवाय, लाचखोरांना एक्सपोझ करण्यातही शेतकरीच पुढे आहेत. यावर्षीच्या १४ पैकी ५ प्रकरणे शेतकऱ्यांनीच उघडकीस आणली आहेत. ट्रान्सफार्मर बदलून देण्यासाठी, फेरफार नक्कल देण्यासाठी, तुषार सिंचन अनुदान, शेती मशागतीस रोजगार मागणी, सिंचन विहिरीचे अनुदान देण्यासाठी लाच मागणाऱ्यांना शेतकऱ्यांनी जाळ्यात अडकविले आहे.

कोट...

गतवर्षी पहिलाच लॉकडाऊन व तोही कडक असल्याने लाचखोरी काहीअंशी थांबली होती. आता मात्र, पुन्हा ती जोमात सुरू झाली आहे. नागरिकांनी शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा शासनाचे मानधन, अनुदान घेणाऱ्या व्यक्ती, शासकीय काम करून देण्यासाठी पैसे मागणाऱ्या व्यक्तींची तक्रार थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करावी. ०२४७२-२२२८७९ या कार्यालयीन क्रमांकावर किंवा अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक फोनवरूनही आपली तक्रार नोंदवावी.

- प्रशांत संपते, उपाधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग