लोकमत न्यूज नेटवर्क
उमरगा : तालुक्यातील जकेकूरवाडी येथे रोटरी क्लबच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी रोटरी कम्युनिटी कॉर्प्स हा सामाजिक सेवा संघ स्थापन करण्यात आला आहे. या संघाचे पहिले संस्थापक अध्यक्ष म्हणून हरिदास यशवंत भोसले, तर उपाध्यक्ष माधव तुकाराम गायकवाड, सचिव राम ज्ञानोबा सूर्यवंशी, सहसचिव परमेश्वर धनुरे, खजानीस बाबुराव कलशेट्टी यांची निवड करण्यात आली.
यावेळी रोटरी कम्युनिटी कॉर्प्सचे सदस्य म्हणून मधुकर सूर्यवंशी, बाबुराव चिट्टे, हरिदास औरादे, दत्तात्रय वाकळे, बाबुराव सूर्यवंशी, महादेव भोसले, बाबुराव औरादे, बाबुराव कलशेट्टी, माणिक सूर्यवंशी, गोपाळ गायकवाड, राम कांबळे आदींची निवड करण्यात आली. यावेळी सर्व पदाधिकारी व नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. राजे शिवाजी रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अमर सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. सचिव अमित रेड्डी यांनी आभार मानले.