यावेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. सिद्रामाप्पा खजुरे यांनी वाचनालय स्थापनेपासून आजपर्यंतची माहिती सांगितली. कार्यक्रमास अमोल नरवडे, पांडुरंग बोंगरगे, रेवणसिद्ध स्वामी, गुरुनाथ कबाडे, अमर नरवडे, मुख्याध्यापक वसंत कबाडे, वाचनालयाचे सचिव वसंत चिंचाले, राम जवळगे, श्याम जवळगे, श्रीधर नरवडे, अविनाश नरवडे, मोहन नरवडे, अनंत नरवडे, देवीदास बोंगरगे व रचना कन्स्ट्रक्शन लिमिटेडचे शहापूर ऑफिसचे खाते व्यवस्थापक महेश व्हरकाटे, अभियंता वैजनाथ बसुदे, सदानंद रेड्डी, योगेश हांजगे, संजय पाटील आदी उपस्थित होते.
शहापूर येथे सरपंच उमेश गोरे, उपसरपंच प्रदीप काळे, सामाजिक कार्यकर्ते भास्कर सुरवसे, स्थानिक शेतकरी नेताजी काळे, अमोल नरवडे, अनंत नरवडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. गुजनूर येथेही माजी सरपंच हरिष पाटील, साहेबराव पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी टीम लीडर महेंद्रकुमार सिंग, के.के. सिंग, रचना कन्स्ट्रक्शनचे शहापूर ऑफिसचे खाते व्यवस्थापक महेश व्हरकाटे, अभियंता वैजनाथ बसूदे, सदानंद रेड्डी, सूरज घोगरे, योगेश हांजगे, संजय पाटील, अभिषक घुगे आदींची उपस्थित होती.