सौर पंपाची प्लेट अन् ॲडेस्ट रॉड केला लंपास
उस्मानाबाद : शेत विहिरीवरील सौरपंपाची प्लेट व ॲडेस्ट रॉड अज्ञात चोरट्याने चाेरून नेला. ही घटना कळंब तालुक्यातील डिकसळ येथे २८ जानेवारी रोजी घडली.
डिकसळ येथील अण्णासाहेब बोधले यांच्या शेत विहिरीवरील सौर पंपाची प्लेट व ॲडेस्ट रॉड अज्ञात चोरट्यांनी २८ जानेवारी रोजी चोरून नेला. याप्रकरणी अण्णासाहेब बोधले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला.
भरधाव वाहनाच्या धडकेत ट्रकचालक ठार
उस्मानाबाद : नादुरुस्त ट्रक दुरुस्त करीत असलेल्या एका ट्रकचालकाला अज्ञात वाहनचालकाने धडक दिली. या अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू झाला. ही घटना उस्मानाबाद शहरात ५ फेब्रुवारी रोजी घडली.
कर्नाटक राज्यातील बसवकल्याण येथील कैलास देवगिरी गोसावी यांचा ट्रक (क्र. एपी. १६ टीपी १८१९) हा ५ फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद येथील एमएच फुटमॉलसमोरील पर्यायी मार्गावर नादुरुस्त झाला. नादुरुस्त ट्रक दुरुस्त करीत असतानाच अज्ञात वाहनाच्या चालकाने गोसावी यांना धडक दिली. यात गोसावी यांचा जमखी होऊन मृत्यू झाला. या अपघातानंतर अज्ञात वाहन चालक वाहनासह पसार झाला. आनंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक बब्रूवान बेडके यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.