शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपदाच्या दृष्टीने उमेदवार निवडीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:30 IST

उमरगा : तालुक्यात ४९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून, आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांची वर्णी ग्रामपंचायतच्या सत्ताकेंद्रावर लागावी, यासाठी गावपातळीवरील प्रत्येक पक्षाचा ...

उमरगा : तालुक्यात ४९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून, आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांची वर्णी ग्रामपंचायतच्या सत्ताकेंद्रावर लागावी, यासाठी गावपातळीवरील प्रत्येक पक्षाचा गावपुढारी प्रयत्न करीत आहे. दरम्यान, यंदा पहिल्यांदाच सरपंच आरक्षण निवडणुकीनंतर निघणार असल्याने त्या दृष्टीनेच उमेदवारांचा शोध देखील घेतला जात आहे. तालुक्यातील तुरोरी, मुळज, बलसुर, दाळींब, गुंजोटी या मोठ्या गावातही ग्रामपंचायत निवडणुका होत असून, व्यापाऱ्यांचे गाव म्हणून ओळख असलेल्या तुरोरी येथे मागील तीस वर्षांपासून काँग्रेस व सेना आलटून पालटून सत्तेवर येतात. यावेळी मात्र येथे काँग्रेस व राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप यांनी पॅनल तयार केले असून, व्यापारी महासंघाने ही आपले स्वतंत्र पॅनल उतरविल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. दुसरीकडे गावातील प्रतिष्ठित व नागरिकांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्या अनुषंगाने तिन्ही पॅनलच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात असून, येत्या दोनचार दिवसात काय निर्णय होतो हे कळणार आहे

भाजपचे नेते कै. शिवाजीदादा चालुक्य व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबा पाटील यांचे गाव असलेल्या मुळज येथेही निवडणूक होऊ घातली आहे. या दोन नेत्यांच्या प्रभावाखाली हे गाव विभागले गेले असले तरी दिवंगत शिवाजीदादा चालुक्य यांचे सुपुत्र व जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभय चालुक्य यांनी मागील निवडणुकीत एकहाती सत्ता मिळविली होती. यावेळी या दोन्ही नेत्यांत मनोमिलन झाल्याचे दिसून येते. त्यातूनच ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी त्यांच्यात बोलणी चालू असली तरी काँग्रेसचाही येथे प्रभाव असल्याने त्यांनीही पॅनलची तयारी सुरू केली आहे.

गुंजोटी या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीवर सध्या काँग्रेस व शिवसेनेचा प्रभाव आहे. येथे मागील पाच वर्षात काँग्रेसची सत्ता होती. याही वेळी काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्रित लढत असून, शिवसेनेनेही जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. दरम्यान, यावेळी माजी सैनिक देखील ग्रामपंचायतच्या निवडणूक मैदानात उतरत असून, गावात माजी सैनिकांची संख्या लक्षणीय असून असल्याने स्वतंत्र पॅनल तयार करून मैदानात उडी घेतली आहे. त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे. यासोबतच दाळींब व बलसूर या गावात राष्ट्रवादीचा मोठा प्रभाव असून, येथे राष्ट्रवादीने जोरदार फिल्डिंग लावली असली तरी काँग्रेस व शिवसेनेकडूनही मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील या मोठ्या गावात सर्वच पक्षांनी आपापली सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न चालविले असून, सरपंचपदाचे आरक्षण निवडणूक झाल्यानंतर जाहीर होणार असल्याने राजकीय पक्ष प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून सरपंचपदाचे आरक्षण व त्यासाठी आवश्यक असलेल्या आपल्या गटातील माणूस कोण, याचा शोध घेत आहेत.

४९ ग्रामपंचायतींची निवडणूक

१७१ प्रभाग

४५३ सदस्य

९०७८० एकूण मतदार

४२६५३ महिला

४८१२७ पुरूष