शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरचा होरपळून मृत्यू; घात की अपघात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:34 IST

उस्मानाबाद : शहरालगतच्या एका मोकळ्या आवारात जळालेल्या कारमध्ये एका डॉक्टरचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी उजेडात आली होती. ...

उस्मानाबाद : शहरालगतच्या एका मोकळ्या आवारात जळालेल्या कारमध्ये एका डॉक्टरचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी उजेडात आली होती. या डॉक्टरची ओळख मध्यरात्रीच्या सुमारास पटली असून, हे प्रकरण घात, अपघात की आत्महत्या, अशा तिहेरी गुंत्यात अडकले आहे.

उस्मानाबाद शहरातून गेलेल्या धुळे-सोलापूर महामार्गालगत ग्रीनलॅण्ड शाळेच्या बाजूच्या मोकळ्या आवारात बुधवारी सायंकाळी एका कारने पेट घेतला होता. ही कार पूर्णत: जळून गेल्यानंतर आत ड्रायव्हिंग सीटवर एका व्यक्तीचा होरपळलेला मृतदेह आढळून आला. दरम्यान, रात्री उशिरा या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. उस्मानाबाद शहरात राहणाऱ्या व येडशी येथे क्लिनिक चालविणाऱ्या डॉ.रवींद्र करपे यांचा तो मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी शहर ठाण्यात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. दरम्यान, हे प्रकरण नेमके कसे घडले, याबाबत आणखी खुलासा होऊ शकला नाही. घात, अपघात व आत्महत्या अशा तिहेरी बाजूंनी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मयत डॉ.करपे यांचा व्हिसेरा घेऊन तो फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला आहे. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतील. शिवाय, तपासालाही दिशा मिळू शकेल. तोपर्यंत शहर पोलिसांनी घात-अपघाताच्या दृष्टीने आपला तपास सुरू केला आहे.