शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

डाॅक्टरांच्या जागा फुल्ल, कर्मचाऱ्यांची वानवाच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:34 IST

कळंब - कोरोनाच्या संकटामुळे आरोग्य यंत्रणेवरील कामाचा ताण वाढलेला आहे. असे असतानाच ग्रामीण आरोग्याचा भार असलेल्या आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची ...

कळंब - कोरोनाच्या संकटामुळे आरोग्य यंत्रणेवरील कामाचा ताण वाढलेला आहे. असे असतानाच ग्रामीण आरोग्याचा भार असलेल्या आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची पदे ‘फुल फील’ झाली असली तरी इतर कर्मचाऱ्यांची मात्र १६८ पैकी ५९ पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा भार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या खांद्यावर आहे. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या प्राथमिक आरोग्य व आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून गावगाड्यात आरोग्य सुविधा पुरवल्या जातात.

यात तपासणी, संदर्भ सेवा, औषधोपचार, आंतररुग्ण व बाह्यरुग्ण सेवा यासह विविध आरोग्यविषयक कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते. यासाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक अशा विविध पदावर कर्मचारी नियुक्त करत आरोग्य सेवांना बळकटी दिलेली असते.

उपरोक्त नियमित कामाची जबाबदारी असतानाच सध्या कोरोना महामारीच्या संकटाने ग्रामीण आरोग्य यंत्रणेवर कामाचा अधिक ताण वाढवला आहे. अगदी रॅपिड व आरटीपीसीआर स्वॅब संकलन ते लसीकरण अशी विविध कामे कोरोना काळात ग्रामीण आरोग्य यंत्रणेला करावी लागत आहेत.

याशिवाय नियमित कुटुंब कल्याण कार्यक्रम, बालकांचे लसीकरण ते बाह्यरुग्ण तपासणी तर सुरूच असते. एकूणच कामाची व्याप्ती वाढली असताना ग्रामीण आरोग्य संस्थांतील आरोग्य कर्मचाऱ्यांची मात्र अनेक पदे रिक्त आहेत. यामुळे आधीच मोठी जोखीम पत्करून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत चालला असल्याचे दिसून येत आहे.

कर्मचाऱ्यांची ६७ पदे रिक्त ...

तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र व २९ उपकेंद्र आहेत. यात प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी दोन याप्रमाणे १२ वैद्यकीय अधिकारी तर उपकेंद्रात २४ कम्युनिटी हेल्थ ऑफिसर कार्यरत आहेत. एकूणच सद्या डॉक्टरांची स्थिती ‘फुल फील’असली तरी आरोग्य सेवक, आरोग्य व सहायक यांची २४ तर परिचराची १२ पदे रिक्त आहेत.एकूणच तालुक्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची १६८ पदे मंजूर असून यापैकी १०४ कार्यरत तर ५९ पदे रिक्त आहेत.

मंगरूळ, इटकूर, शिराढोणकडे लक्ष हवे...

तालुक्यातील इटकूर पीएचसीमध्ये १९ गावे आहेत. याठिकाणची २४ पैकी १० जागा रिक्त आहेत. याअंतर्गतच्या स्वास्थ्य अभ्यंगता, पाथर्डी, हसेगाव, वाकडी केंद्रात आरोग्य सेवकांची पीएचसी स्तरावर तीन परिचर कार्यरत नाहीत. एकूण २५ गावाचा भार असलेल्या शिराढोन पीएचसीमध्ये ३६ पैकी ११ पदे रिक्त आहेत. हसेगाव, पिंप्री, देवळाली, गौरगाव येथील आरोग्य सेवकाची जागा रिक्त आहे. मंगरूळ पीएचसीमध्ये १७ गावे असून ३३ पैकी १३ पदे रिक्त आहेत. अंतर्गतच्या गोविंदपूर, करंजकल्ला, भाटशिरपुरा, देवळाली, गौरगाव येथील पदे रिक्त आहेत.

भाटशिरपुरा येथील डाॅक्टरला कार्यमुक्त करण्यात आले आहे. आराेग्य सेविकांनाही इतर ठिकाणी नियुक्ती देण्यात आली. परिणामी गावात उपकेंद्र असूनही आराेग्य सेवा मिळत नाही. त्यामुळे काेराेनाच्या संकट काळातही संबंधित केंद्र बंद राहत आहे. याचा फटका ग्रामस्थांना बसत आहे.

त्यामुळे गावातील लाेकांनी आराेग्य सुविधा

भाटशिरपुरा ‘रिक्त पद, डॉक्टर कार्यमुक्त व आहे त्या आरोग्य सेविकांना इतर ठिकाणी नियुक्ती यामुळे उपकेंद्र असूनही गावात आरोग्य सेवा मिळत नाहीत. वरील कारणामुळे करोना काळातही उपकेंद्र हमेशा बंद राहते. त्यामुळे गावातील लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध होईल, याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन आवश्यक तेवढा कर्मचारीवर्ग नियुक्त करावा.

-सूर्यकांत खापे, उपसरपंच, भाटशिरपुरा.

वाकडी येथील आरोग्य उपकेंद्रातील रिक्त पदामुळे कोरोना काळात खूप अडचण येत आहेत. लॉकडाऊनमुळे वयोवृद्ध व्यक्तींना कळंब येथे ये-जा करणे त्रासदायक होत आहे. यामुळे चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी आरोग्य उपकेंद्रात लवकरात लवकर आरोग्य सेवक, आरोग्य सेविका यांची नियुक्ती करावी.

-बालाजी कोल्हे, माजी सरपंच, वाकडी (के.)

तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची संख्या चांगली आहे. काही आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचारी व परिचराची पदे रिक्त आहेत. आम्ही यासाठी अतिरिक्‍त जबाबदारी सोपवत आहोत. कामकाजावर परिणाम होणार नाही याची पुरेपूर काळजी घेत आहोत.

- डॉ. प्रदीपकुमार जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी

दृष्टिक्षेपात रिक्त पदे

पीएचसी मंजूर पदे रिक्त पदे

दहिफळ २१ ०७

मंगरूळ ३३ १३

येरमाळा २२ १०

शिराढोन ३४ ११

मोहा २४ ८

इटकूर २४ १०