उमरगा : लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे यांनी येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास गुरुवारी सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात चालू असलेल्या कामकाजाची पाहणी करून सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले.महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पर्यवेक्षक प्रा. शैलेश महामुनी यांनी संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी माजी शिक्षणाधिकारी शिवाजी जाधव, उपप्राचार्य प्रा. जी. एस. मोरे, डॉ. विलास इंगळे, डॉ. संजय अस्वले, डॉ. धनाजी थोरे, प्रबंधक राजू सोनवणे, कार्यालय अधिष्ठाता नितीन कोराळे आदी उपस्थित होते.