शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पुतळा सुशोभिकरण करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:30 IST

उस्मानाबाद : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यावतीने ...

उस्मानाबाद : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यावतीने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पालिका प्रशासनाने एप्रिल महिन्याची वाट न पाहता जानेवारी महिन्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा सुशोभिकरणाचे काम हाती घेतल्यास ते व्यवस्थित व नियोजनबद्ध तसेच चांगल्या दर्जाचे होईल, तसेच हे काम चांगल्या पद्धतीने व्हावे, या दृष्टीने मुख्याधिकाऱ्यांनी स्वत: यात लक्ष द्यावे, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

पुतळ्याच्या सौंदर्यात आणखी भर पडण्याच्या दृष्टीने या पुतळ्यासमोर भारतीय संविधान उद्देशिकाचे प्रतीकात्मक शिल्प बसविण्यात यावे, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी रिपाइंचे शहराध्यक्ष उदयराज बनसोडे, तालुकाध्यक्ष भालचंद्र कठारे, जिल्हा संघटक सोमनाथ गायकवाड, तालुका कार्याध्यक्ष संपत जाधव, तसेच स्वराज जानराव, उमेश वाघमारे, जयपाल सुरवसे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित विभागास तत्काळ आदेश देऊन कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या अनुषंगाने सूचना दिल्याची माहिती रिपाइंच्यावतीने पत्रकाद्वारे देण्यात आली.

‘अनुकंपाधारकांना नियुक्त्या द्या’

उस्मानाबाद : जिल्ह्यातील नगर परिषदा आणि जिल्हा प्रशासनाकडून पात्र अनुकंपाधारकांची प्रतीक्षा सूची तयार करण्यात आलेली नाही. त्यामुळे रिक्त जागा असतानाही मागील अठरा वर्षांपासून नियुक्तीस टाळाटाळ होत असल्याचा आरोप जलित मित्र संघाचे राज्य सचिव तथा अधिकारी, कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष शंकर खुने यांनी केला आहे. अनुकंपाधारकांनी अनेक वेळा विनंत्या, उपोषणे केली; परंतु प्रत्येक वेळी आश्वासनाशिवाय त्यांना काहीच मिळाले नाही. त्यामुळे येत्या दहा दिवसांत पात्र अनुकंपाधारकांना नियुक्त्या द्याव्यात, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा खुने यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिला आहे.