शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

स्मारकाचे काम सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:30 IST

जिल्हाध्यक्षपदी संजय पाटील भूम : राष्ट्रवादी काँग्रेस व्हीजेएनटी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी संजय वसंतराव पाटील आरसुलीकर यांची निवड झाली आहे. त्यांना ...

जिल्हाध्यक्षपदी संजय पाटील

भूम : राष्ट्रवादी काँग्रेस व्हीजेएनटी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी संजय वसंतराव पाटील आरसुलीकर यांची निवड झाली आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी माजी युवक जिल्हाध्यक्ष नितीन बागल, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मसूद शेख, उस्मानाबाद शहरध्यक्ष अय्याज शेख, राजकुमार घरत, भागवान पाटील आदी उपस्थित होते.

अक्षय मुळीक यांची अध्यक्षपदी नियुक्ती

कळंब : मराठा सेवा संघाच्या उस्मानाबाद येथे झालेल्या बैठकीत अक्षय सुब्राव मुळीक यांची वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मराठा सेवा संघांचे जिल्हाध्यक्ष तुषार पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तानाजी चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष अतुल गायकवाड यांच्या हस्ते मुळीक यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव आशिष पाटील, मनोज पाटील, आदित्य देशमुख, आकाश मुंडे, शिवदास पवार आदी उपस्थित होते. अक्षय मुळीक यांनी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेच्या विविध पदांवर काम केले आहे.

शेळगावात गरजूंना शेळ्यांचे वाटप

परंडा: प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने तालुक्यातील शेळगाव येथील गरजू स्वाती पवार व प्रियंका दैन या महिलांना शेळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शेळगावचे नूतन सरपंच सुलोचना शेवाळे व उपसरपंच राजेंद्र जगताप यांचा सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमास पं. स. सभापती अनुजा दैन, सतीश दैन, विष्णू शेवाळे, माणिकबाबा विद्यालयाचे प्राचार्य गुरूदास काळे, डॉ. लहू शेवाळे, शांतीनाथ वाघमारे, अकबर शेख, दत्तात्रय पुरी, जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत, रघुनाथ दैन, संतूक कडमपल्ले, धनंजय आंधळे, तालुकाध्यक्ष विनोद सुरवसे, ज्योती देशमुख, लक्ष्मण औताडे, शहाजी झगडे, मनीषा कुलकर्णी, निलेश कुलकर्णी, अमोल रणशूर आदी उपस्थित होते.