शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांच्या धडकेत हरणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:32 IST

जेवळी परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर उन्हाची तीव्रता वाढली आहे. शेतशिवारात पाणी नसल्याने अनेक वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे ...

जेवळी परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर उन्हाची तीव्रता वाढली आहे. शेतशिवारात पाणी नसल्याने अनेक वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे येत आहेत. दक्षिण जेवळी येथील १३३ केव्ही उपकेंद्रासमोर असलेल्या राज्य महामार्ग क्रमांक २११ वर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. याच ठिकाणी सोमवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास एक गरोदर हरिणी रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनांच्या धडकेत गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडली होती. यावेळी तेथून जाणारे सामाजिक कार्यकर्ते महादेव कारभारी व अतुल बनसोडे यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी या हरणाला बाजूला घेऊन प्राथमिक उपचार केले, भोसगा येथील वनविभागाला घटनेची माहिती कळविली. मात्र, उपचार होईपर्यंत हरणाचा मृत्यू झाला.

वनविभागाचे वनरक्षक राठोड, कर्मचारी बसवंत बिराजदार यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. यावेळी महादेव कारभारी, गुरुनाथ भुसाप्पा, जीवन तोरकडे, किशोर होनाजे, धनराज गुंजोटे, उपस्थित होते.