तालुक्यातील शेंडी, इंदापूर, ईसरूप, शेलगाव, जवळका, पारगाव, कडकनाथवाडी, तेरखेडा, कवडेवाडी, मांडवा या गावांमध्ये दहा पेक्षा जास्त कोरोना बाधितरूग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाकडून जाहीर केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. कोणताही आजार अंगावर न काढता लक्षणे असतील तर रुग्णालयात जावून तपासणी करून घ्यावी. गृह विलीनीकरणाची सुविधा घेतलेल्या रुग्णांनी १७ दिवसांपर्यंत घराबाहेर पडू नये.
गावाचे सरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य कर्मचारी, शाळेतील शिक्षक यांनी या कठीण काळात एकजुटीने काम करून प्रसार थांबविण्याची जबाबदारी पार पाडावी. याबाबत कोणतीही अडचण असल्यास प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधाण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी आहिल्या गाठाळ व तहसीलदार नरसिंग जाधव यांनी केले आहे.