शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेह एकाचा, दिला दुसऱ्यांना; नंतर म्हणाले तो नव्हे, हा तुमचा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:34 IST

उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयातील मृत्यूंच्या घोळात गुरुवारी आणखी एक अजब-गजब प्रकरण बाहेर आले. मृत वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगून ...

उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयातील मृत्यूंच्या घोळात गुरुवारी आणखी एक अजब-गजब प्रकरण बाहेर आले. मृत वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगून बुधवारी (दि. ५) मृतदेह नातेवाइकांना सोपविण्यात आला होता. त्यांनी त्याच दिवशी अंत्यविधीही केला. मात्र, गुरुवारी पुन्हा याच महिलेवर पालिका अंत्यसंस्कार करणार आहे. आपण या, असा फोन नातेवाइकांना गेला. यामुळे जिल्हा रुग्णालयातील अनागोंदी उघड झाली आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथील एका वृद्ध महिलेची प्रकृती खालावल्याने त्यांना मंगळवारी (दि. ४) सायंकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्याच दिवशी रात्री या महिलेचा मृत्यू झाल्याचे नातेवाइकांना सांगण्यात आले. दरम्यान, पुढच्या प्रक्रियांमुळे लागलीच मृतदेह देण्यात आला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नातेवाइकांना या महिलेचा मृतदेह कोविड संशयित असल्याने पॅक करून देण्यात आला. त्यामुळे नातेवाइकांनी चेहरा न पाहताच तो गावी नेऊन अंत्यविधी उरकून घेतला. गुरुवारी राख सावरण्याचा विधी करून सगळे घरी परतल्यानंतर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातून या नातेवाइकांना फोन गेला. तुमच्या परिवारातील मृत महिलेवर उस्मानाबाद येथे पालिकेकडून अंत्यसंस्कार होणार आहेत. आपण उपस्थित राहावे, असे सांगितल्यावर नातेवाइकांचे होशच उडाले. त्यांनी तातडीने जिल्हा रुग्णालय गाठून मृतदेहाची पाहणी केली तेव्हा तो आपल्याच कुटुंबातील महिलेचा असल्याचे लक्षात आले. यावरून नातेवाईक चांगलेच संतप्त झाले होते. त्यांच्याकडून कारवाईची मागणी केली जात आहे.

तो मृतदेह कोणाचा?

बुधवारी (दि. ५) जिल्हा रुग्णालयातून जो मृतदेह वाघोली येथील महिलेचा समजून पॅक करून देण्यात आला होता, त्यावर विधीवत अंत्यसंस्कारही करण्यात आले आहेत. मात्र, बुधवारी कळविण्यात आलेला मृतदेह खरा निघाल्याने पहिला मृतदेह कोणाचा होता, या प्रश्नाचे उत्तर मिळू शकले नाही.

डी.के. आप गजहब है...

या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. के. पाटील यांना विचारणा केली असता, त्यांनी निर्धास्तपणे उत्तरे दिली. केवळ स्टिकरमध्ये बदल झाल्याने हा सगळा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय, हा विषय चर्चेअंती संपुष्टात आल्याचेही ते म्हणाले. यावरून किती शिस्तीत या जिल्हा रुग्णालयाचा कारभार चाललाय, हेच अधोरेखित होत आहे.