शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

गावकुसाबाहेरील वस्तीवरही कोरोना चाचणी शिबिर यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:23 IST

कळंब : आरोग्यविषयक जागृती नसलेल्या लोकांची कोरोना चाचणी करण्यासाठी थेट गावकुसाबाहेरील वस्ती गाठली खरी. पण स्थानिकांचा यास तीव्र विरोध ...

कळंब : आरोग्यविषयक जागृती नसलेल्या लोकांची कोरोना चाचणी करण्यासाठी थेट गावकुसाबाहेरील वस्ती गाठली खरी. पण स्थानिकांचा यास तीव्र विरोध जाणवला. यावेळी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांचे समुपदेशन करीत थेट वस्तीवर कोरोना चाचणीचा ‘कॅम्प’ यशस्वी केला. आरोग्य विभाग प्रत्येक घटकांसाठी किती कार्यशील आहे, हे यातून बोर्डा उपकेंद्राने दाखवून दिले आहे.

तालुक्यातील जवळपास सोळा गावांत आदिवासी पारधी समाजाची दखलपात्र लोकसंख्या आहे. अपवादात्मक दोन, तीन गावे वगळता इतर गावांत हा समाज शेत, गायरान असा गावकुसाबाहेर वसलेला दिसून येतो. ईटकूर, मस्सा, कन्हेरवाडी, मोहा, आंदोरा, शेळका धानोरा, शिराढोण अशा अनेक गावातील त्यांच्या अशा वस्तीला ‘पिढी’ या नावानेच ओळखले जाते. या वस्तीवर राहणारे लोक काटक असले तरी त्यांच्यात आरोग्यविषयक जाणीवजागृतीचा अभाव दिसून येतो. यामुळेच बोर्डा येथील आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी (सिएचओ) डॉ. आकांक्षा पाटील यांनी आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शेळका धानोरा गावच्या पारधी वस्तीवर थेट पोहोचत कोविड टेस्ट कॅम्प घेण्याचा, तेथील नागरिकांना आरोग्यविषयक सल्ला देण्याचा व कोविडची काळजी कशी घ्यावयाची याचे धडे देण्याचा निर्णय घेतला.

यानुसार त्यांनी आरोग्यसेवक तपसे, आरोग्यसेविका शिंदे, आशाताई मनीषा सव्वाशे यांनासोबत घेत पारधी पिढी गाठली. प्रारंभी स्थानिकांनी कोरोना तपासणीस तीव्र विरोध केला. यानंतर योग्यवेळी तपासणी, निदान झालं तर कोरोनावर सहज मात करता येते. यामुळे घाबरू नका, आम्ही आहोत, असे डॉ. पाटील यांनी समुपदेशन केल्यानंतर हळूहळू एकेकजण तयार होऊ लागले. यानंतर २७ संशयितांच्या टेस्ट झाल्या. या सर्व निगेटिव्ह आल्या. परंतु, डॉक्टरांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सोबत घेत थेट पारधी पिढी गाठल्यामुळे त्या लोकांची भीती दूर झाली. आपण सध्यातरी निश्चिंत आहोत हे माहीत झाल्याचा आनंद स्थानिक लोकांत होता. त्यांच्या या प्रयत्नांना ग्रामपंचायत सदस्य तथा ज्येष्ठ नेते नानासाहेब शेळके, युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख सागर बाराते, बाप्पासाहेब कोरे, ग्रामसेविका एस. आर. साळुंके यांचीही मदत लाभली. यामुळेच तपासणीपासून दूर असलेल्या दुर्लक्षित पारधी वस्तीवरच्या नागरिकांची कोविड टेस्ट होऊ शकली.

चौकट..........

कोरोना कंट्रोलमध्ये

डॉ. आकांक्षा पाटील कार्यरत असलेल्या बोर्डा उपकेंद्राच्या अंतर्गत बोर्डा, खेर्डा, तांदूळवाडी व शेळका धानोरा ही गावे आहेत. या गावात टेस्टिंग, ट्रेसिंग व ट्रिटमेंट यावर भर देण्यात येत आहे. यामुळे सध्या कोरोना कंट्रोलमध्ये आहे. केवळ चार रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. एकूण २७८ टेस्ट करण्यात आल्या आहेत. अगदी सुटीच्या दिवशीही सेवा बजावली जाते. कोरोनाची लक्षणे अंगावर न काढता, वेळीच टेस्ट कशी होईल यावर फोकस केले जाते, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.