उमरगा : येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील समाजशास्र विभागाची विद्यार्थिनी शुभांगी अविनाश कदम (जगताप) यांनी प्रोफेसर डॉ. संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच समाजशास्र विषयात पीएच.डी. मिळाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव, समाजशास्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप पाटील, माजी प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते हा सत्कार पार पडला. याप्रसंगी समाजशास्र विभागप्रमुख डॉ. पी. डी. पाटील यांचाही पीएच.डी. प्राप्तीनिमित्त सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार यांनी सत्कार केला. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, उपप्राचार्य डॉ. अस्वले, उपप्राचार्य प्रा. बापू मोरे, प्रा. सतीश गावीत, डॉ. अनिल गाडेकर व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. अस्वले, सूत्रसंचालन डॉ. अर्जुन कटके यांनी केले. आभार डॉ. धनराज ईटले यांनी मानले.
शुभांगी कदम यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:27 IST