शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक विहिरींची कामे तातडीने पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:42 IST

सीईओचे निर्देश -विहिरींची केली पाहणी.... उस्मानाबाद- जिल्ह्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीची कामे तात्काळ पूर्ण करण्याबाबत डॉ विजयकुमार फड, मुख्य ...

सीईओचे निर्देश -विहिरींची केली पाहणी....

उस्मानाबाद- जिल्ह्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीची कामे तात्काळ पूर्ण करण्याबाबत डॉ विजयकुमार फड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना निर्देश दिले आहेत.

जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी ५९४ विहिरींना मंजुरी देण्यात आली. ही कामे तातडीने पूर्ण होणे आवश्यक असल्यामुळे सदर कामांची वस्तुस्थिती जाणून घेता येण्यासाठी डॉ. विजयकुमार फड यांनी जिल्ह्यातील काही विहिरींना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली. बऱ्याच प्रमाणात विहिरींची कामे पूर्णत्वास आली असली तरीही अनेक विहिरींची कामे अर्धवट असल्यामुळे ती तातडीने पूर्ण करावीत. या विहिरी मुळे संबंधित गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्यास मदत होणार आहे. जवळपास सर्वच विहिरी ह्या सिंचन तलाव, पाझर तलाव, नैसर्गिक पाणवठे आदींच्या जवळपास असल्याने विहिरींना चांगले पाणी लागत आहे. कोणत्याही गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ नये. तसेच प्रत्येक गावांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या दृष्टिकोनातून या सर्व सार्वजनिक विहिरींचे कामकाज तातडीने पूर्ण होणे आवश्यक असल्याचे फड यांनी सांगितले. फड यांनी तुळजापूर, उमरगा, लोहारा या तालुक्यातील दौऱ्यात काही विहिरींच्या कामांची पाहणी करून कामाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबतचा आढावा घेतला. फड यांच्यासोबत यावेळी त्या-त्या तालुक्याचे गट विकास अधिकारी, गावचे ग्रामसेवक, सरपंच आदी उपस्थित होते.