शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

कळंबमध्ये उभारणार शेतीमाल प्रक्रिया उद्यागोचे क्लस्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:27 IST

(फोटो : बालाजी आडसूळ १४) कळंब : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी व शेती क्षेत्राच्या विकासासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या शेतकरी उत्पादक ...

(फोटो : बालाजी आडसूळ १४)

कळंब : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी व शेती क्षेत्राच्या विकासासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून कळंब तालुक्यात शेतीमाल प्रक्रिया उद्यागोचे क्लस्टर उभारण्यात येणार आहे. या अनुषंगाने आंदोरा येथे या कंपन्याच्या संचालकांची नुकतीच बैठक पार पडली.

शेती क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी शासन काही धोरणात्मक योजना राबवत आहे. यात समुह पद्धतीने शेती करणे, पिकपद्धतीत बदल व यात समुह तत्त्वाचा अवलंब करणे,प्रक्रिया उद्योग वाढवणे, याच्या उभारणीत शेतकर्‍यांचा एक मालक म्हणून सहभाग नोंदवणे यावर भर दिला जात आहे. याच उद्देशाने शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यातून कळंब तालुक्यातील विविध गावात शेतकऱ्यांनी एकत्र अशा कंपन्या स्थापन केल्या आहेत. या कंपन्यांच्या संचालकांची बैठक आंदोरा येथे पार पडली. यावेळी यासंदर्भात नाबार्डच्या सहयोगाने रचनात्मक कार्य करणाऱ्या सहकारी विकास महामंडळाचे राज्य व्यवस्थापक तथा महा ॲग्रो एफपीओ फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक विजय गोफणे यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती. उस्मानाबाद येथील आत्माचे नेताजी चव्हाण, येडाई शेतकरी उत्पादक कंपनीचे डॉ. संदीप तांबारे व तालुक्यातील पंधरा शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक उपस्थित होते. यावेळी श्री गोफणे यांनी शेतकरी उत्पादक कंपनी, यामधील व्यवसाय संधी याविषयी मार्गदर्शन केले तर नेताजी चव्हाण यांनी शासनाच्या विविध योजना, अटी व नियम याविषयी माहिती दिली.

चौकट....

शेतमाल प्रक्रिया उद्योगाचे क्लस्टर

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेती व शेतकरी विकासाचा प्रयत्न करताना ‘क्लस्टर’ निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. याचा त्या-त्या भागातील शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे. यातूनच कळंब तालुक्यात शेतकरी उत्पादक कंपनीच्या शेतमाल प्रक्रिया उद्योगाचे ‘क्लस्टर’ उभा करण्यात येणार आहे असे डॉ. संदीप तांबारे, विजय गोफणे यांनी यावेळी सांगितले.