शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

दहा जागांसाठी तामलवाडीत चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:25 IST

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी ग्रामपंचायतीच्या ११ जागांपैकी एक जागा बिनविरोध झाल्याने १० जागांसाठी निवडणूक होत आहे. ३ हजार ...

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी ग्रामपंचायतीच्या ११ जागांपैकी एक जागा बिनविरोध झाल्याने १० जागांसाठी निवडणूक होत आहे. ३ हजार मतदार १० सदस्यांची निवड करणार असून, २४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात भाजप, महाविकास आघाडी, सर्वधर्म समभाव या तिघांत चुरशीचा सामना रंगणार आहे.

उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी महाविकास आघाडीचे आप्पासाहेब रणसुरे हे बिनविरोध निवडून आले तर १० जागांसाठी बाजार समितीचे संचालक यशवंत लोंढे, माजी सरपंच दतात्रय वडणे, माजी उपसरपंच हमीद पठाण, माजी सैनिक शिवाजी सावंत, सुधीर पाटील यांच्यासह २४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व होते. त्यामुळे पाच वर्ष केलेल्या विकासकामांवर उमेदवार पुन्हा मतदारांसमोर जात आहेत. महाविकास आघाडीने बदल हवा म्हणून निवडणूक रिंगणात दंड थोपटले असून, सर्वधर्म समभाव पॅनेलनेही उमेदवार उभे करून निवडणुकीत रंगत वाढविली आहे.

सध्या प्रचाराने चांगलाच जोर धरला आहे. गृहभेटी, वैयक्तिक गाठीभेटी, सोशल मीडियातून प्रचार, प्रचार रॅलीतून शक्तिप्रदर्शन घडवून बळ वाढविले जात आहे. सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले नसताना ते स्वप्न पाहत विजयी पताका खेचून आणण्याकडे उमेदवार प्रचाराचा जोर वाढत आहेत.

चौकट

पिंपळ्यात एका जागेसाठी निवडणूक

पिंपळा (बु.) ग्रामपंचायतीच्या ८ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. राखीव जागेवरील उमेदवार निवडीवर एकमत न झाल्याने एका जागेसाठी दोन उमेदवारांत लढत होणार आहे. या लढतीकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.