शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना चाचणी, लसीकरण केंद्र वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:41 IST

कळंब : शहरात नागरिकांची कोरोना चाचणी व लसीकरणासाठी होणारी गर्दी पाहता चाचणी व लसीकरणासाठी शहरात प्रशासनाने विभागनिहाय व्यवस्था करावी, ...

कळंब : शहरात नागरिकांची कोरोना चाचणी व लसीकरणासाठी होणारी गर्दी पाहता चाचणी व लसीकरणासाठी शहरात प्रशासनाने विभागनिहाय व्यवस्था करावी, अशी मागणी आता पुढे आली आहे. चाचणीसाठी वेळेचे बंधन असल्याने उशिरा नावनोंदणीसाठी येणाऱ्या अनेकांच्या चाचण्या होत नसल्याचे समोर येते आहे.

शहर व परिसरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासन व‌ आरोग्य विभागाने शहरात लसीकरणासाठी डाॅ. रामकृष्ण लोंढे यांचा दवाखाना व चाचणीसाठी पुनर्वसन सावरगाव विभागातील नगर परिषद शाळा क्र. २ येथे व्यवस्था केलेली आहे. ही दोन्हीही ठिकाणे शहरातील चोंदे गल्ली, शेरी गल्ली, भीमनगर, कल्पना नगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर, बाबा नगर, गांधी नगर, महसूल कॉलनी, मोमीन गल्ली, मार्केट यार्ड, दत्तनगर, इंदिरा नगर आदी बहुसंख्य लोकसंख्य वस्तीसाठी गैरसोयीचे आहेत.

याची दखल घेऊन शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते मकरंद पाटील, ॲड. मंदार मुळीक, संजय जाधवर, संजय होळे यांनी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आणखी एक कोरोना चाचणी व लसीकरण केंद्र शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे नगर परिषद शाळा क्र. १ व जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे सुरू करण्याची मागणी केली आहे.

कळंब शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता कोरोना चाचणी व लसीकरण करण्यासाठी केंद्र वाढविण्याची आवश्यकता सध्या प्राधान्यतत्त्वावर आहे. त्यातही लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी वेगळी व्यवस्था करण्याचीही मागणी होते आहे. आरोग्य यंत्रणेकडे मनुष्यबळ कमी असल्याने इतर ठिकाणी चाचणी व लसीकरण केंद्र चालू करता येत नसेल तर आणखी मनुष्यबळ वाढविण्याची मागणीही आता पुढे येत आहे.